पक्षांचेसंवर्धन काळाची गरज -मुख्य अभियंता शरद भगत पारच्या वन्यजीव संस्थेने लावल्या पक्षीघागर...
अकोला जिल्हा प्रतिनिधी....
20 मार्च नुकताच जागतिक चिमणी दिवस पार पाडला असून आता उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली उन्हाळ्यात प्राण्यांना पक्षांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असून त्या अभावी कीप्रत्येक पक्षी आपला जीव गमावून बसतात. पाण्याअभावी पक्षांचा जीव जाऊ नये म्हणून गेल्या नऊ वर्षापासून वन्यजीव संस्था पारसचा वतीने पक्षीघागर उपक्रम राबविन्यात येत असतो. यावर्षी हा कार्यक्रम पारस येथील औष्णिक वीज केंद्र प्रकल्पात घेण्यात आला असून त्यावेळी पारस प्रकल्पाचे प्रमुख शरद भगत यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेण्यात आला पक्ष्यांचे संवर्धन ही काळाची गरज असून मानवी जीवनात पक्षांचे महत्त्व समजून त्यांच अस्तित्व नष्ट होऊ नये यासाठी मोठे पाऊल उचलणे गरजेचे आहे .कारण जंगलाची निर्मिती करण्यासाठी मोठे योगदान पक्षांचे आहे वळ, कडुनिंब ,उंबर, पिंपळ यासारखे शेकडो वर्ष जगणारे व भरपूर ऑक्सिजन देणारे वृक्ष व त्यांच्या बिया ह्या पक्षाच्या विस्टे मुळे स्थानांतरित होतात आणि वृक्षाची निर्मिती होते यासाठी पक्षी महत्त्वाचे आहेत अशी माहिती मुख्य अभियंता भगत यांनी दिली.वन्यजीव संस्था गेली नऊ वर्षापासून उन्हाळ्यात पक्षांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पक्षी घागर हा उपक्रम राबवित असते विशेष म्हणजे या घागर मातीच्या असल्यामुळे पक्षांना होणारा डी हायड्रेशणचा त्रास होत नाही. प्लास्टिक भांडे लावल्यास त्यातील पाणी गरम होते पण वन्यजीव संस्था निव्वळ उपक्रम म्हणून कार्य करत नसून निसर्गाचे संतुलन सांभाळते ही कौतुकास्पद बाब आहे.अशी माहिती वैद्यकीय प्रशासक डॉक्टर तायडे यांनी देत संस्थेचे कौतुक केले.यावेळी वीज प्रकल्पाचे अधिकारी मुख्य अभियंता शरद भगत , धनराज पंधाडे उपमुख्य अभियंता, संजय कांबळे अधीक्षक अभियंता, राजेश गट्टूवार अधीक्षक अभियंता, डॉक्टर राजेश तायडे वैद्यकीय प्रशासक, आशिष तळवेकर वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थापक,शितल चोपडे सुरक्षा अधिकारी हर्षल नाटे सुरक्षा अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.वन्यजीव संस्थेचे पक्षी घागर या उपक्रमासाठी गणेश साबळे,उमेश बांबळकर,प्रवीण पोटे,गौतम गवई यांनी आर्थिक सहकार्य केले तसेच गेल्या वर्षापासून संस्थेतर्फे पक्षी घागर सोबत प्राणी घागर हा उपक्रम पण सुरू करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेच्या सदस्या सर्प मैत्रीण प्रतिभा ठाकरे यांनी दिली. यावेळी वन्यजीव संस्था पारस चे अध्यक्ष जगदीश रेवतकर,अनवर अंसारी,विनय शर्मा, दीपक लोड,हरीश तायडे,,विकास ठाकरे,अक्षय गाडगे,प्रमोद रोहनकर,सोनाली रेवतकर,नितीन ठाकरे.उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आराध्या रेवतकर, प्रणित ठाकरे, ओम रेवतकर, अनन्या ठाकरे यांनी परिश्रम घेतले.