मुंबई भाजपा प्रदेश कार्यालय येथे विदर्भ विभागीय बैठक संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी ....
मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये विदर्भ विभागीय बैठक भव्यपणे संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण, विदर्भ विभाग संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश महामंत्री व आमदार रणधीर सावरकर, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक, तसेच राजेश पांडे, मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे आणि खामगाव जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बूथ समित्यांच्या संदर्भातील आढावा घेण्यात आला.बैठकीत विदर्भ विभागातील बूथ समित्यांची रचना आणि त्यामधील शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख अद्यावत यादी यांचा सविस्तर आढावा घेतला गेला. तसेच खामगाव जिल्ह्यातील मंडलांच्या कार्यकारिणीची निकषानुसार रचना आणि प्रस्तावित जिल्हा कार्यकारिणीची रूपरेषा यांचेही चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये प्रत्येक मंडलाच्या कार्यप्रणालीतील ताकदी आणि सुधारणा करण्याच्या बाबतीत चर्चा करण्यात आली, ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारी अधिक सुदृढ होईल.विशेष म्हणजे, या कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख आणि मंडल अध्यक्ष यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. यामुळे पक्षातील संघटनात्मक बांधिलकी आणि संघटनमधे उत्साह वाढीस लागला आहे.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येत्या वेळात विदर्भ विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बूथ स्तरावर कार्यक्रियाशीलता वाढेल, असे सांगितले. तसेच त्यांनी बूथ समित्यांच्या कार्यक्षमतेवर भर देत, जागरूकतेने काम करण्याचा आवाहन केले. विदर्भ विभागासाठी पक्षाच्या धोरणांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन दिले आणि संपूर्ण विभागाला एकत्र बांधण्याची गरज अधोरेखित केली.या बैठकीमध्ये विदर्भ विभागाच्या सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक बाबतीत महत्त्वपूर्ण टप्प्याला भेट देण्यात आली असून आगामी योजनांसाठी मोकळी चर्चा झाली. पक्षाची तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर सशक्त करण्यासाठी ही बैठक एक मोलाची पायरी होती.