अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाचा खामगाव येथील महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न.. टिप्पर चालक व मालका विरुद्ध गुन्हा दाखल....
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
गौण खनिजाची अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने खामगाव येथील महसूल पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर टिप्पर नेऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना कोत्ता शिवारात नॅशनल हायवे क्रमांक 53 चे गट नंबर 78 मध्ये घडली. असून याप्रकरणी जलंब पोलिसांनी टिप्पर चालक व मालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.खामगाव येथील तहसीलदार पाटील यांनी अवैध रित्या गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक कारवाई करीत असताना विशाल अशोकराव देशमुख हा त्याच्या ताब्यातील टिप्पर मध्ये अवैध रित्या गौण खनिज घेऊन येताना दिसला त्याला महसूल कर्मचाऱ्यांनी थांबवून तुझ्याकडे रॉयल्टी आहे का याबाबत विचारपूस केली असता टिप्पर चालकाकडे रॉयल्टी नसल्याचे टिप्पर चालकांनी महसूल कर्मचाऱ्यांना सांगितले व त्याने त्याच्या ताब्यातील आयशर कंपनीचे विना क्रमांकाचे असलेले पिवळ्या रंगाचे टिप्पर हे फिर्यादी व साक्षीदार यांच्या अंगावर आणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना लोट पाठ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.या घडलेल्या घटनेमध्ये महसूल पथकातील साक्षीदार शैलेश सारंगधर बाठे, अंकुश अशोक अग्रवाल, संजय रामदास काळमेघ हे तीन कर्मचारी जखमी असल्याचे समजते.अशी तक्रार ग्राम महसूल अधिकारी राहुल अशोक चौधरी यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी टिप्पर चालक विशाल अशोकराव देशमुख व मालक गोविंदा फुंडकर रा. पिंप्री देशमुख यांच्याविरुद्ध अप नं.151/25कलम109,132,121(1),119(1),303(1),3(5) B N S अन्वे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे व रायटर रवींद्र गायकवाड करीत आहेत..