भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक...


 
भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक...                           

जळगाव जा प्रतिनिधी:-

 खामगाव जिल्यातील मागील तीन महिन्यांत प्रदेशाकडून आलेल्या कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतरचा संक्षिप्त अहवाल भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी वर्धा येथील विदर्भ भाजपा कार्यकर्त्यांच्या  मेळाव्यात   मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांना सादर करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण अहवाल पाहून सचिन देशमुख यांची प्रशंसा केली.वर्धा येथे विदर्भ विभागातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा नियोजन मेळावा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साही वातावरणात पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख हे सुध्दा उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. “स्थानिक स्वराज्य संस्था या केवळ निवडणुकीपुरत्या मर्यादित संस्था नसून त्या लोकसहभागातून विकास घडवणाऱ्या प्रभावी यंत्रणा आहेत,” असे स्पष्ट करत त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या जबाबदाऱ्या अधिक काटेकोरपणे पार पाडण्याचे आवाहन केले.“घरोघरी विकास, मनामनात विश्वास” या मंत्राने प्रेरित होऊन कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पक्षाची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी संघटनात्मक बळकटी, जनसंपर्क आणि स्थानिक विकास कामांवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.या नियोजन मेळाव्यात विविध प्रशासकीय व पक्षविषयक विषयांवर चर्चा झाली. आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे व कंबर कसण्याचे आवाहन करण्यात आले.

Previous Post Next Post