दारूबंदीसाठी महिला धडकल्या पोलिस ठाण्यावर सोमवारखेडाच्या महिला झाल्या आक्रमक...


 
दारूबंदीसाठी महिला धडकल्या पोलिस ठाण्यावर सोमवारखेडाच्या महिला झाल्या आक्रमक...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा  तालुक्यातील सोमवारखेडा गावातील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री व जुगाराच्या विरोधात पोलिस ठाण्यात जोरदार निदर्शने केली. गावात वाढत चाललेली दारू व जुगाराची सवय विशेषतः अल्पवयीन मुलांना बरबादीकडे नेत आहय्यामुळे संतप्त महिलांनी पोलिस प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.निदर्शनादरम्यान महिलांनी स्पष्टपणे सांगितले की, जर २४ तासांच्या आत गावातून अवैध दारूविक्री व जुगाराच्या अड्ड्यांचे उच्चाटन झाले नाही, तर त्या तीव्र आंदोलन छेडतील. महिलांचा आरोप आहे की, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातील अल्पवयीन मुलेही दारू आणि जुगाराच्या विळख्यात सापडली असून त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक रचना ढासळत आहे.महिलांचे हे आंदोलन केवळ सामाजिक जागृतीचे प्रतीक नाही, तर ग्रामीण समाज आता व्यसनांवर एकत्र येऊन आवाज उठवत असल्याचेही सूचित करते. आता पाहावे लागेल की प्रशासन ही चेतावणी किती गांभीर्याने घेते आणि कारवाई कधी होते.                _______________________________________

ग्रामपंचायतीने अनेक वेळा दारूबंदीबाबत ठराव घेतले आहेतः परंतु तरीही अवैध विक्रेत्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे गावातील सर्व महिलांनी अबकारी विभागासह चिखलदरा पोलिस ठाण्यात ठराव सादर करून त्वरित कारवाईची मागणी केली आहे.


ज्योती ठाकूर,

उपसरपंच, सोमवारखेडा...

Previous Post Next Post