💥४७ पैकी २५ ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज.. जळगाव जामोद तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील एकूण ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम ३० (४) (अ) अन्वये, मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणुक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार व ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयाची अधिसूचना दिनांक १७ जुन २०२५ तसेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेश क्र. कावि./अ.का./ग्रापनि/कक्ष-१४/४२७/२०२५ दि. १७.०६.२०२५ मधील निर्देशानुसार जळगांव जामोद तालुक्यातील सन २०२५ ते २०३० दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीव्दारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत मधील सरपंच पदाचे आरक्षण हे महिला आरक्षणासह निश्चित करण्याकरीता सोडत सभा दिनांक ०८ जुलै रोजी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालय जळगांव जामोद येथे तहसीलदार पवन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ७ ग्रामपंचायती असून ४ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव आहेत,२) अनुसूचित जमातीसाठी ८ ग्रामपंचायती राखीव असून ४ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव आहेत..३) नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १३ ग्रामपंचायती राखीव असून ७ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव आहेत..४) सर्वसाधारण मध्ये १९ ग्रामपंचायती असून त्यामध्ये १० ग्रामपंचायती ह्या महिलांसाठी राखीव आहेत.सर्वप्रथम लोकसंख्येच्या (सन २०११ ची) उतरत्या टक्केवारी प्रमाणे अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. सदर आरक्षण निश्चित करतांना सन १९९५ ते २०२० पर्यंत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती याकरीता राखीव ठेवण्यात आलेल्या ग्रामपंचायती सोडत काढतांना वगळण्यात आल्या.त्यानुसार खालीलप्रमाणे ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत..अनुसुचित जाती करीता आरक्षित ग्रामपंचायती १. सावरगांव २. पिंपळगांव काळे ३. टाकळी पारस्कर.अनुसुचित जाती महिला करीता आरक्षित ग्रामपंचायती १.आसलगांव २. वडगांव गड ३. खेर्डा बु ४. मांडवा.--अनुसुचित जमाती करीता आरक्षित ग्रामपंचायती १. हिंगणा बाळापूर २. भेंडवळ बु ३. पळशी वैद्य ४. उमापूर--अनुसुचित जमाती महिला करीता आरक्षित ग्रामपंचायती १. भिंगारा २. बोराळा बु ३. सुलज. ४. बोराळा खुर्द.--नागरीकांचा मागास प्रवर्ग करीता आरक्षित ग्रामपंचायती...१.आडोळ बु २. मानेगांव ३. वडगांव पाटण ४. निंभोरा बु ५. खेर्डा खुर्द ६. पळसखेड.--नागरीकांचा मागास प्रवर्ग करीता आरक्षित ग्रामपंचायती-१. मडाखेड खुर्द २. गोळेगांव बु ३. गोळेगांव खुर्द ४. भेंडवळ खुर्द ५. दादुलगांव ६. सुनगांव ७. चावरा.--सर्वसाधारण प्रवर्ग-१. रसुलपुर,२. पळशी सुपो,३. जामोद,४. धानोरा,५. खांडवी,६. वडशिंगी,७. झाडेगांव,८. तिवडी अजमपूर,९. गाडेगांव खुर्द--सर्वसाधारण महिला प्रवर्ग-१. गाडेगांव बु २. काजेगांव,३. अकोला खुर्द,४. माहुली,५. कुवरदेव,६. मडाखेड बु,७. पिंप्री खोद्री,८. कुरणगाड बु,९. सातळी १०. कुरणगाड खुर्द.वरीलप्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण महिला सरपंच पदाचे आरक्षणासह सोडतीव्दारे काढण्याची कार्यवाही करण्यात आली. आरक्षण सोडत शैलेष काळे उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांचे नियंत्रणात पवन पाटील तहसिलदार जळगांव जामोद यांचे अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी निवडणुक नायब तहसिलदार बी एस किटे, महसुल नायब तहसिलदार मयुरेश भुजबळ, सत्यविजय जाधव सहायक महसुल अधिकारी, नितीन वाघ निवडणुक ऑपरेटर तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, रिपाई जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे, शिवसेना विधानसभा प्रमुख भीमराव पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष अँड.भालेराव, शिवसेना शहरप्रमुख संजय भुजबळ, मोहम्मद साबीर, अशोक काळपांडे यांच्या सह तालुक्यातील राजकीय मंडळींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.