अंजनगाव सुर्जी येथे अब्दुल कलाम अब्दुल कदिर ( सहाय्यक पोलीस उप निरीक्षक) यांना वाहिली श्रद्धांजली...
अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा वलगाव पोलीस सटेशन चे सहाय्यक उप पोलिस निरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांना पत्रकार संघ व सामाजिक संघठना तसेच समस्थ नागरिकांन तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.दि. 28 जून रोजी सायंकाळी पाच वाजता अब्दुल कलाम अब्दुल कदिर हे घरून वलगाव पोलीस स्टेशनला निघाले असताना वलगाव अमरावती रोड ऑर्चिड शाळेजवळ त्यांच्या दोन चाकी वाहनाला आरोपियांनी पूर्ण कट रचून मोटरसायकल ला धडक मारून व धारदार शास्त्राने १४ वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर अमरावती शहर व आजूबाजूचे व सर्व पोलीस विभागा मध्ये शोकाकुल वातावरण पसरले होते व सामान्य जनतेत एक प्रकारची भीती निर्माण झाली होती त्यानिमित्ताने अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद शाळा क्रमांक ५ येथे अब्दुल कलाम अब्दुल कदिर यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये अंजनगाव सुर्जी चे समाजसेवक व पत्रकार व इतर सर्व गावातील नागरिक उपस्थित होते या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपी ताब्यात घेतले असून सी.पी चौरिया यांचे मार्गदर्शन मध्ये सागर पाटील व पाच अधिकारी व इतर पोलीस कार्मचारी तपास करत आहे.या भावपूर्ण श्रद्धांजली च्या कार्यक्रमात आरोपींना कठोर शिक्षा देण्याचे मत सर्वांनी वेक्त केले आहे व हा खटला फास्ट ट्रेक न्यायालयात सरकार ने टाकावे असे मत व्यक्त केले जात आहे.