जळगांव जामोद शहरातील विविध समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व सेवादल च्या वतीने देण्यात आले निवेदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
दिनांक 8 जुलै 2025 रोजी नगर परिषद जळगाव जामोद चे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी यांना नगर परिषद चे मुख्याधिकारी यांच्या मार्फत माजी नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍड भाऊराव भालेराव यांच्या उपस्थितीत शहरातील विविध समस्या बाबतचे निवेदन दिले.जळगाव जामोद शहरात आगामी काळात होऊ घातलेल्या न. प.निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेले प्रभाग रचनेची प्रक्रिया ही पारदर्शकपणे व निष्पक्षपातीपने करण्यात यावी.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील बांधण्यात आलेले व्यापारी गाळे व चौपाटी लवकरात लवकर गरजूंना देण्यात यावे तसेच त्यामध्ये अपंगांकरिता व आर्थिक दुर्बल घटकांकरिता आरक्षण देण्यात यावे. नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा अध्यायावत करून शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात याव्या,जेणेकरून न. प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊन पटसंख्येची समस्या सुटेल व गोरगरीब नागरिकांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.शहरातील वाढती लोकसंख्या पाहता उपलब्ध असलेल्या अंगणवाड्यांची संख्या कमी पडत आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागांमध्ये दोन याप्रमाणे वाढीव अंगणवाड्या देण्यात याव्या.शहरातील वायलीवेस येथील स्मशानभूमी तसेच शहरातील इतर सर्व स्मशानभूमी व कब्रस्तान यांची नियमित साफसफाई करून येथे पुरेशी लाईट व्यवस्था,पाणी व्यवस्था व बैठक व्यवस्था करण्यात यावी.पावसाळ्याचे दिवस असल्याने ठिकठिकाणी गटारे साचलेली असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे त्याकरिता कीटकनाशकाची धूर फवारनी करण्यात यावी.संपूर्ण शहरात कचरा संकलन व लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई नियमितपणे करण्यात यावी.तहसील कार्यालय समोरील छत्रपती संभाजी महाराज चौकात तसेच संपूर्ण शहरात रहदारीच्या रस्त्यावर मोकाट जनावरांचे वास्तव्य असते. आपल्या देशात व संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या वाहनामुळे जनावरांना/ गाईंना इजा पोहोचण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या मोकाट जनावरांची योग्य ती व्यवस्था करण्यात यावी.शहरातील दैनिक भाजी बाजारामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरलेले असून तेथील स्वच्छतागृह व संपूर्ण परिसराची नियमितपणे साफसफाई करण्यात यावी त्याचप्रमाणे शहरांमध्ये आवश्यक ठिकाणी मुत्रीघरे निर्माण करण्यात यावेत. अश्या मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.याप्रसंगी माजी नगरसेवक ऍड.संदीप मानकर, ओ.पी.तायडे, अयाज अहमद, सय्यद तौफिक, अब्दुल जहीर,सय्यद जमीर,सय्यद खलील, सय्यद अफरोज,जुनेद शेख,अनिल इंगळे, सैयद जाबिर, मुस्तफा खान तसेच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बंधू उपस्थित होते.