💥"Career Guidance"आदिवासी समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व स्तकार कार्यक्रम संपन्न....


 💥Career Guidance"आदिवासी समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व स्तकार कार्यक्रम संपन्न....

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

दिनांक 06/07/2025 रोज रविवारला जय आदिवासी समाज विकास संघटन महाराष्ट्र अचलपूर तर्फे परतवाडा अचपुर जुडवा शहरात देवमाळी येथील सभागृहात आयोजित आदिवासी समाज गुणवंत विद्यार्थी  यांचे गुणगौरव "Career Guidance" मार्गदर्शन व सत्कार कार्यक्रम संपन्न.जय आदिवासी समाज विकास संघटन महाराष्ट्र अचलपूर द्वारा आयोजित आदिवासी समाज गुणवंत विद्यार्थ्यांचे गुण गौरव व सत्कार समारंभ दिनांक 6 जुलै 2025 रोज रविवारला अचलपूर परतवाडा जुडवा शहरात देवमाळी येथील सभागृहात आयोजित केले होते,सदर कार्यक्रम मध्ये जवळपास 104 विद्यार्थी व पालक वर्ग तसेच 13 तज्ञ मंडळी उपस्थित होते समाजातील व मार्गदर्शन करणारे असे तज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून कॅरिअर गायडन्स मध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर्वांना समजेल असे उत्कृष्ट  मार्गदर्शन केले सर्वप्रथम या कार्यक्रमाचे सुरुवात पूजन करून आदिवासी कोरकु समाजाचे आराध्य दैवत जय मुठवा बाबा यांचे आरती करून सुरुवात झाली सदर कार्यक्रम मध्ये अध्यक्ष स्थान जय आदिवासी समाज विकास संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री गानुजी सावलकर प्रमुख अतिथी उपाध्यक्ष आशाताई कासदेकर सचिव श्री दीपकजी कासदेकर सहसचिव श्री उमेशजी जांभेकर कोषाध्यक्ष सौ सुमेरीताई कासदेकर सभासद सौ मुन्नीताई जांभेकर  श्रीचंदजी जांभेकर श्री मिठारामजी कोल्हेकर श्री अनिलजी भास्कर व सल्लागार adv.सारिका जांभेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कॅरियर गायडन्स मध्ये मार्गदर्शन करण्याकरिता सर्व स्वखर्चाने उपस्थित झालेले डॉक्टर निलेश कासदेकर आयआयटी मद्रास चेन्नई इथून शिक्षण घेतलेले कृणाल कासदेकर,संत गाडगेबाबा  युनिव्हर्सिटी येथून पीएचडी करणारे अजय जामूनकर,मनमोहक कासदेकर तसेच विजयवाडा तेलंगणा येथून शिक्षण घेतलेले प्लॅनिंग प्रोफेशनल प्रतिक कोल्हेकर,एग्रीकल्चर असिस्टंट राकेशजी भूसुम, पंजाब देशमुख कॉलेज ऑफ लॉ कॉलेज मधून एलएलबी करीत असलेले सारिका जांबेकर असिस्टंट प्रोफेसर ममता चिमोटे,पियूष ढेकले लेबॉट्री असिस्टन असे तज्ज्ञ मंडळी यांनी सदर कार्यक्रम मध्ये उत्कृष्ट असे त्यांना दिलेले टॉपिकनुसार पूर्ण दिवस उपस्थित राहून खूप छान आणि सरळ भाषेत समजावून मार्गदर्शन केले.सोबतच विद्यार्थी यांचे सोबत संवाद साधून समस्याचे व  प्रश्नाचे समाधान तिथेच केले. सोबतच या कार्यक्रमांमध्ये समाजातील अधिकारी वर्ग सुद्धा उपस्थित होते यामध्ये माननीय श्री महादेवराव कासदेकर विस्तार अधिकारी पंचायत माननीय श्री रविंद्रजी दारसिंबे, विस्तार अधिकारी पंचायत माननीय श्री निलेशजी भुयार विस्तार अधिकारी पंचायत  सोबतच माननीय श्री राम जी सावरकर पोलीस विभाग माननीय श्री बळीरामजी कासदेकर शिक्षण विभाग माननीय हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व पालकांना आपले  पाल्यांना मुला मुलींना पुढील उच्च शिक्षण व शिक्षणाकरिता मिळणारे सुख सुविधा यामध्ये वस्तीगृह कॉलरशिप एमपीएससी यूपीएससी नोकरी बाबत व शैक्षणिक असे विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रम मद्ये अमरावती येथील दृष्टीहिन कुमारी आनंदी भुयार अमरावती यांनी 10 वी मद्ये 87% गुण प्राप्त करून मराठी या विषयात 100पैकी 100 गुण प्राप्त केले. त्यांना मणिपाल यूनिवर्सिटी कर्नाटक येथे गीता श्लोक व संस्कृत या विषयावर अवार्ड प्राप्त झाले तिचा व सहकुटुंब विशेष सत्कार करण्यात आले.त्यांचे दृष्टी नसलेले कुमारी आनंदी निलेशराव भुयार या विद्यार्थिनीने हिंदी/इंग्रजी मध्ये सर्व उपस्थिताना व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे या कार्यक्रमात दुपारनंतर सर्वांना मसाला खिचडी असा स्वादिष्ट भोजन संघटनचे सचिव श्री दीपकजी कासदेकर व त्यांचे धर्म पत्नी सविताताई कासदेकर अमरावती यांनी या रिमझिम पावसात गरमागरम भोजन तयार करून स्वतः तयार करून दिले.सदर कार्यक्रम करिता उत्कृष्ट नियोजन तथा कार्यक्रम करिता कोणाकडूनही वर्गणी देणगी शासकीय अनुदान घेतलेले नाही तरीसुद्धा सदर कार्यक्रम इतके नियोजन पद्धतीने संपन्न झाले त्यामुळे उपस्थित सर्व पालक वर्ग विद्यार्थी वर्ग मार्गदर्शक यांनी जय आदिवासी समाज विकास संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारणी यांचे दिवसभर खूप खूप कौतुक केले व आभार मानले.

Previous Post Next Post