मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कुटे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट...जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ही होते सोबतीला...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद मतदार संघांचे भाजपा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री स्व. उर्मिला श्रीराम कुटे यांचे दुःखद निधन झाले आहे. या निमित्ताने आमदार कुटे यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर येत असून आज दुपारी तीन वाजता च्या दरम्यान ते जळगाव जामोद येथे दाखल झाले. हेलिपॅड वरून आपल्या ताफ्यासह ते आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर हे सुद्धा हजर होते. कुटे कुटुंबियांची सात्वन पर भेट घेतल्यानंतर ते जळगाव कडे रवाना झाले. पत्रकारांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला....