गाडेगाव बुद्रुक येथे शिवसेना (उबाठा) शाखा गठीत...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन मजबूत व्हावे तसेच गावागावात शिवसेनेची शाखा स्थापन करण्याचा मानस घेऊन नवनियुक्त तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी कंबर कसली असून दिनांक ६ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्राम गाडगाव बुद्रुक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ग्राम शाखा तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थापन करण्यात आली आहे. यावेळी बोलताना तालुक्यामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटन मजबूत व जोमाने वाढवणार असल्याचे मत तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी ग्राम शाखा उद्घाटन करतेवेळी व्यक्त केले आहे.गाडेगाव बुद्रुक येथील प्रमोद कांडेलकर शाखा प्रमुख, आकाश पुरी उपशाखाप्रमुख, गणेश आढाव सचिव, मोहन ईटखेडे सहसचिव ,एकनाथ सोळंके कोषाध्यक्ष, सूरज पुरी, मुकुंदा जाणे,शुभम ईटखेडे,शाम चोपडे, सागर वानरे,राम चोपडे, बळीराम निंबाळकर, ध्यानश्वर जाणे इत्यादी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.