राष्ट्रवादी तेल्हारा तालुकाध्यक्षपदी सुरेश ओंकारे यांची निवड...
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील रहिवासी माजी सरपंच सुरेश ओंकारे यांची अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तेल्हारा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.ही निवड राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष मोहम्मद बद्रुजम्मा, इंगोले यांच्याशी विचारविन्मय करून निवड केली. सुरेश ओंकारे यांच्या हाती राष्ट्रवादीची तेल्हारा तालुक्याची कमान दिली असून ओंकारे यांनी सुद्धा मी तेल्हारा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा जास्तीत जास्त प्रसार करून अनेक गरजू नागरिक असो किंवा शेतकरी प्रत्येकाची समस्या सोडवणार व येणाऱ्या नगरपरिषद निवडणूक, जिल्हापरिषद, पंचायत समिती प्रत्येक निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणणारच असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला.