गौलखेडा बाजार येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा...
राजु भास्करे/ अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती चिखलदरा धारणी मेळघाट या गावाच्या ठिकाणी दि ९/८/२०२५ ला मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे.त्याच प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार या गावात शिव सती धाम या मंदिराच्या परिसरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.या कार्यक्रमात उपस्थित पाहूने मंडळी यांनी गावातील नागरिकांना बिरसा मुंडा,तट्टया मामा,रेग्या कोरकु यांच्या बाबतीत माहिती दिली आहे.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून अमरावती जिल्हा परिषद समाजकल्याण माजी सभापती दयाराम काळे हे उपस्थित होते.तसेच गावातील पोलिस पाटील रमेश महल्ले, बाबुलाल दारसिंबे, भिमराव भास्कर,रेखा जामकर कलावती मावस्कर,भारती माडवे.गन्सांराम मावस्कर सर, गोपाल भास्कर, गणेश मोरणे,टिकाराम दहीकर,गौरव भाऊ असे अनेक गावातील नागरिक या जागतिक आदिवासी दिनाला उपस्थित होते.