राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये खिंडार — ॲड. संदीप उगले पाटील वंचितच्या गडात...!


 
राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये खिंडार — ॲड. संदीप उगले पाटील वंचितच्या गडात...!

जळगाव जामोद प्रतिनिधी:-

गुरुवार दि.14 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे मा. जिल्हा चिटणीस, मा. तालुकाध्यक्ष, मा. संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच जिल्हा पुनर्वसन समिती सदस्य ॲड.संदीपदादा उगले पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला.हा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीचे दमदार जिल्हा अध्यक्ष मा. देवाभाऊ हिवराळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष मा. मोहितदादा दामोदर यांच्या सक्रिय सहकार्याने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झालेल्या या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात व जळगाव जामोद तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी भक्कम होणार आहे.

Previous Post Next Post