"जीवनाला सुखमय, शांतीमय बनवण्यासाठी स्वतःवर आणि आपल्या परिवारावर प्रेम करा.." राजयोगिनी उर्मिला दीदी......
जळगाव (जामोद) प्रतिनिधी:-
जीवन हे अनमोल आहे.जीवनाला सुखमय शांतीमय, बनवायचं असेल तर व्यसनाचा त्याग करावा लागेल. तणाव आणि डिप्रेशन यामधून निघण्याचा उपाय व्यसन नाही, मेडिटेशन आहे. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला महत्त्व द्या व परिवारावर प्रेम करा असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बुलढाणा च्या संचालिका राजयोगिनी उर्मिला दीदी यांनी केले. स्थानिक प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्य केंद्राच्या युवा प्रभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त आयोजित "नई उमंग नई तरंग" ह्या कार्यक्रमात १२ ऑगस्ट रोजी त्या प्रमुख अतिथी आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून अध्यक्षपदावरून बोलत होत्या.समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बुलढाणा केंद्राच्या प्रमुख संचालिका उर्मिला दीदी ह्या ह्या होत्या.तसेच अतिथी म्हणून बुलढाणा येथील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष प्रा. संतोषराव आंबेकर, प्रा.सौ. मीनलताई आंबेकर,तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अविनाश उमरकर, दि न्यू ईरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य भगत सर, श्री. विजयसिंह राजपूत,तसेच नगरपरिषद मुडेकर मॅडम, जयश्री दीदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परमेश्वराचे स्मरण करून दिप्रज्वलन करण्यात आले. कुमारी साक्षी कपले इने स्वागत नृत्य सादर करून सर्वांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा यथोचित मार्गदर्शन केले. राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रम "नई उमंग -नई तरंग "साठी युवक आणि युवतींची लक्षणीय उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन बी.के.उमाकांत भाऊ ढगे व प्रास्ताविक जयश्री दीदी तसेच आभार कोथळकर सर यांनी केले....