पिंपळगाव काळे येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व ‘हर घर तिरंगा’ रॅली....


 
पिंपळगाव काळे येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व ‘हर घर तिरंगा’ रॅली....

जळगाव जामोद प्रतिनिधी....

सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीमजी पटेल, उपाध्यक्ष कय्युमजी पटेल, सहसचिव रब्बानीजी देशमुख, संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय सेवा योजना पथक, बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने पिंपळगाव काळे गावात महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता मोहीम व ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांची नीटनेटकी स्वच्छता करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी पुतळ्यांभोवती परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प सर्वांनी केला. स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून समाजात स्वच्छता हीच सेवा हा संदेश पोहोचविण्यात आला.यानंतर गावाच्या मुख्य रस्त्यावरून ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान स्वयंसेवकांनी देशभक्तिपर घोषणाबाजी करत घराघरात तिरंगा फडकवू या – देशप्रेमाची जाणीव वाढवू या अशा घोषणा दिल्या. नागरिकांना राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान व राष्ट्रभक्तीची जाणीव जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख फराह व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्वयंसेवक, विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून गावात स्वच्छता व राष्ट्रभक्तीचा संदेश पोहोचविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चेतन पलन, डॉ. एम. डी. नेतनसकर, डॉ. एस. ए. काझी. डॉ. बी.ए. सांगळे, डॉ. एन. के. अग्रवाल, डॉ .आनंद जाधव, प्रा. एन. जी. असोले, प्रा. पी . एन. बाठे, डॉ. एस. के. खान, डॉ. डी. आर. सिरसाट, प्रा. जोया आफरीन, गवई सर, सर्व प्राध्यापक व अमोल देवकर, जुबेर खान, जुबेर शेख , आशिष इंगळे, अक्षय तायडे मुसद्दीक पवार शिक्षकेत्तर इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous Post Next Post