ॲमस्टरडेम नेदरलँड (युरोप) स्थित चि सार्थकचा वाढदिवस सातपुडा पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्राम निमखेडी येथे साजरा....
जळगाव जामोद प्रतिनिधी....
दिनांक 14 ऑगस्ट 2025 गुरुवार रोजी ॲमस्टरडॅम नेदरलँड (युरोप) येथील चि सार्थक सुभ्रांशू साहू याचा तेरावा वाढदिवस सातपुडा पायथ्याशी वसलेल्या कोरकू जमात असलेल्या आदिवासी ग्राम निमखेडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असलेली किट तथा स्नेह भोजन देऊन साजरा करण्यात आला.चि सार्थक हा दि न्यू इरा प्राथमिक शाळा जळगाव इथून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक विलासजी सारभूकन तथा सौ शालिनीताई सारभूकन यांच्या विदेशात स्थित मुलीचा मुलगा असून विदेशात राहून सुद्धा त्याच्या आईची इच्छा आपल्या देशातील गरजू विद्यार्थ्यांसोबत सार्थकचा वाढदिवस साजरा करण्याची होती.त्यानिमित्त या परिवाराने आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून दोन रेघी, चार रेघी, बॉक्स कॉपी, पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य असलेली किट प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप केली. तसेच याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्नासह वनभोजन देण्यात आले.प्रसंगी विशेष उपस्थिती असलेले सालईबनचे मनजीतसिंग यांनी सार्थकच्या परिवाराचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश भाऊ बिबोकार ,सालईबनचे मंजीतसिंग, माजी मुख्याध्यापक विलासजी सारभूकन, रमेशभाऊ सारभुकन ,मुख्याध्यापक उमेश खारोडे ,सहायक शिक्षक उमेश भड , सहायक शिक्षक धनराज इंगळे तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक उमेश खारोडे यांनी सारभूकन परिवार तथा साहू परिवाराचे शाळेच्या वतीने आभार मानले व सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
