विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन....
जळगाव जामोद प्रतिनिधी....
जामनेर तालुक्यातील छोटा बेटावद येथील रहिवासी सुलेमान खान यांच्यावर काहीलोकांनी हल्ला केला त्यामध्ये त्याची प्राणज्योत मालवली जेणेकरून अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई व्हावी व ते प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना त्वरित शासन व्हावे निवेदन दिले. महायुतीचे नेत्यांनी निवडणूक प्रचार दरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते सरकार येऊन सहा महिने झाले तरी पण सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय प्रलंबित आहे सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यात यावी या आशयाची निवेदन देण्यात आले.१५ ऑगस्ट २०२५ स्वतंत्र दिनी जिगाव प्रकल्पग्रस्तांचे रस्त्याचे न्याय मागणीसाठी जलसमाधी आंदोलन पूर्णा नदीच्या काठावर सुरू असताना विनोद पवार यांनी जलसमाधी घेऊन न्याय मागण्यासाठी आपले जीवन संपवले आणि प्रशासन बघत राहिले.जिगाव प्रकल्पाच्या आंदोलनाची पूर्वकल्पना प्रशासनाला असताना सुद्धा त्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करून आंदोलन कर्ते विनोद पवार यांना जलसमाधी घेण्यास प्रवृत्त केले असल्यामुळे प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांनवर गुन्हे दाखल करून कारवाई करा विनोद पवार यांचे कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्या आणि त्यांचे राहते घराचा मोबदला तात्काळ द्यावा व मृतकाचे कुटुंबांना न्याय द्यावा . आणि जिगाव प्रकल्पग्रस्तांचा रस्त्याच्या मागणीसाठी असलेल्या प्रश्नाचा त्वरित निकाल लावून त्यांचा प्रश्न सोडवावा.वास्तविक जलसमाधी आंदोलन आहे याची प्रशासनाला माहिती असताना सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने आंदोलन स्थळी एनडीआरएफ ची टीम, लाईफ बोट तैनात न करता आंदोलकांना बेजबाबदारपणे वा-यावर सोडून दिले ही बाब अतिशय गंभीर असून त्याची योग्य ती चौकशी होऊन संबंधितांनवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणे जरुरीचे आहे ह्या आशयाचे निवेदन दिले त्या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राम विजय भाऊ बुरुंगले प्रकाश भाऊ पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ,पक्षनेता स्वातीताई वाकेकर ज्योति ताई ढोकणे अंबादास बाठे अविनाश भाऊ उमरकर अॕड.भालेराव तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी जिल्हा किसान सेलचे संभाजी शिर्के अर्जून घोलप अच्छेखा पठाण अमर पाचपोर जुबेर पटेल शमुभाई जहागीरदार श्रीकृष्ण केदार अजहर देशमुख अय्याजभाई सुरेश वानखडे प्रविण भोपळे विनोद धंदर दिनेश काटकर सय्यद अफरोज हुसेन राही शेख जुनेद अब्दुल राजीक रतन इंगळे अनिल इंगळे सुनील कळस्कर मोहन पान्हेरकर जाबीरभाई शमीमभाई प्रमोद तितरे अनंत झाल्टे मन्सूर शेख विजय गुरव व इतर कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
