शहीद शेतकरी विनोद पवार परिवाराला 50 लाखांची मदत करा.मातृतीर्थ बुलढाणा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करा.आझाद हिंद,सामाजिक संघटनांची मागणी....


शहीद शेतकरी विनोद पवार परिवाराला 50 लाखांची मदत करा.मातृतीर्थ बुलढाणा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करा.आझाद हिंद,सामाजिक संघटनांची मागणी....

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड येथील शेतकरी विनोद पवार  स्वातंत्र्यदिनी जलसमाधी आंदोलनात शहीद झाले. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या परिवाराला 50 लाख रुपये देण्यात यावे. त्यांच्या परिवारातील एका सदस्यांला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे. आदी मागण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, मातृतीर्थ  रणरागिनी संघटना,राष्ट्रीय बजरंग दल, ग्राम स्वराज्य समिती आदी संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.निवेदनामध्ये जिल्ह्यातील शेत रस्ते, पानंद रस्ते अनुषंगाने  जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्या. जिगाव प्रकल्पाच्या पुनर्वसित गावांसाठी प्रथम प्राधान्याने निधीचे वाटप करावे. बुलढाणा जिल्ह्यातील ई सेवा प्रणाली, गाव दत्तक योजना, जिवंत सातबारा, ई रेकॉर्ड फायलिंग योजना महाराष्ट्रात सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यात सुरू करण्यात आल्या. ज्यामुळे जिल्ह्यातील असंख्य शेतकरी कामगारांना महत्त्वपूर्ण योजनांची माहिती घरबसल्या मिळाली. दस्तऐवज घरबसल्या मिळत आहे. प्रसंगी पैसा आणि श्रम दोन्ही वाचले. करिता सदर महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ बुलढाणा पॅटर्न म्हणून सुरू करण्यात यावी. यासह इतर मागण्यांसाठी विविध संघटनांच्या वतीने 18 ऑगस्टला जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,अजित दादा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान मुख्य सचिव आदींना निवेदन देत मागणी करण्यात आली आहे.यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, संजय येंडोले,योगेश कोकाटे,ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पंचफुलाबाई गवई, राष्ट्रीय बजरंग दलाचे विभाग उपाध्यक्ष भूपेश पाटील,राम व्यवहारे,उल्हास काकर, आझाद हिंद कामगार संघटनेचे शेख अफसर,शेख गफार,शेख अनिस आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

Previous Post Next Post