रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर व आयशर वाहनाचा भीषण अपघातात एकाचा मृत्यू ..! वरवट बकाल,संग्रामपूर रस्त्यावरील घटना..!रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश !


 
रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर व आयशर वाहनाचा भीषण अपघातात एकाचा मृत्यू ..! वरवट बकाल,संग्रामपूर रस्त्यावरील घटना..!रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश ! 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, वरवट बकाल मार्गावर दिनांक २३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. केळीने भरलेल्या आयशर आणि रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक होऊन ही दुर्घटना घडली. यामध्ये आयशर मधील क्लीनरचा मृत्यू झाला आहे.मृतक दीपक प्रभातसिंग पवार राहणार जळगांव जामोद असे मृतक इसमाचा नांव आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.  मात्र, या अपघाताने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. या अपघातातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे रेतीने भरून जाणारा एकाच वेळी दोन ट्रॅक्टर असून या घटनेमुळे पुन्हा एकदा तालुक्यात रात्रीच्या वेळी सुरु असलेल्या अवैध रेतीचा वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावर नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, महसूल प्रशासनवर थेट निष्क्रियतेचा आरोप होत आहे.  रात्रीच्या वेळेस खुलेआम अवैध वाळू वाहतूक सुरू असून, याकडे महसुल प्रशासन डोळेझाक करत असल्याचेही आरोप यावेळी होतांना दिसत आहे. भरधाव वेगाने व निष्काळजीपणे  समोरील ट्रेकटरला ओव्हरटेक करून आयशरला जोराने धडक दिल्याने, ट्रॅक्टर व आयशर पलटी झाले होते. यामध्ये आयशरच्या खाली दबून क्लीनरचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे. तरीही तहसीलदार आणि संबंधित अधिकारी गाढ झोपेत असल्याचे आरोप होत आहेत. रात्री घडलेल्या या अपघातात दुसऱ्या दिवशी एक वाजेपर्यंत वरवट बकाल बकाल ग्रामीण रुग्णालयात मृतक इसमावर शवविच्छेदन करण्याचा नातेवाईकांकडून नकार देण्यात आले होते. याप्रकरणी संबंधित आयशर मालकाने तामगाव पोलिसात तक्रार दिल्याने ट्रॅक्टर चालक जिके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक क्लीनर दीपक प्रभात सिंग पवार राहणार जळगांव जामोद हा गाडीचे खाली दबून जागीच मरण पावला.या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस करत आहेत.मृतक दिपक पवार याचे शवविच्छेदन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांची गर्दी जमली आहे.मृतक दिपक पवार याला न्याय मिळेपर्यंत दिपकचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कुटुबियांचे म्हणणे आहे.

Previous Post Next Post