सर्व मानव एकाच माता पिता ची संतती(पवित्र कुराण)डॉ रफिक पारनेरकर...अकोट येथे ऐतिहासिक मस्जिद परिचय , सद्भावना सम्मेलन व सत्कार समारोह संपन्न...


 
सर्व मानव एकाच माता पिता ची संतती(पवित्र कुराण)डॉ रफिक पारनेरकर...अकोट येथे ऐतिहासिक मस्जिद परिचय , सद्भावना सम्मेलन व सत्कार  समारोह संपन्न...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी....

ईश्ॻंथ कुरान म्हणतो  की सर्व मानवजात एकाच आईवडिलांची अपत्ये आहेत. कोणीही कोणापेक्षा मोठा किंवा लहान नाही. चांगले चारित्र्यच माणसाला महान बनवते. जर कोणी एका व्यक्तीला अन्यायाने  ठार मारले  तर त्याने संपूर्ण मानवजातीची हत्या केली , त्याचप्रमाणे ज्याने एका व्यक्तीचे प्राण वाचवले  त्याने संपूर्ण मानवजातीचे प्राण वाचवले  असे पवित्र ग्रंथ कुरआन म्हणतो. माणसाला जर रक्ताची, डोळ्यांची, किडनी व इतर अवयवांची गरज पडली तर कोणी अवयव देणाराची जात, धर्म, पंथ पाहतो का? नाही मग समाजात वावरताना आपण भेदभाव, द्वेष  का करावा ? आपण प्रतिज्ञा करतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत,आपले महान संविधान आपल्याला स्वातंत्र्य,समता, बंधूता व एकतेची शिकवण  देते म्हणून भेदभाव व द्वेष विसरा सर्वांनी आपसात गुण्यागोविंदाने मिळून मिसळून रहावे आग लावणार्या मध्ये नाही तर  आग विझविणार्यांन मध्ये आपले नाव नोंदवा द्वेष पसरविणारे मॅसेज डिलीट करा व प्रेम स्नेह वृद्धिंगत करणारे मॅसेज फारवर्ड करा असे प्रतिपादन  डॉ सय्यद रफीक पारनेरकर यांनी केले.अकोट जामा मस्जिद  येथे  राष्ट्रीय एकता  व  सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी मस्जिद परिचय व सत्कार समारंभाचे आयोजन राईट वे या सेवाभावी संस्थे कडून करण्यात आले होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून  इस्लामिक अभ्यासक व किर्तनकार डॉ सय्यद रफिक पारणेरकर (MBBS M D)बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना  इस्माईल कासमी होते.सत्कारमूर्ती म्हणून सप्त खंजेरी वादक व समाज प्रबोधनकार अनेक पुरस्कार प्राप्त सत्यपाल महाराज, तत्कालीन ठाणेदार संतोष  मनोहरराव महल्ले,सापोउनि हिम्मत दौलतराव दंदी हे लाभले होते. प्रा. इब्राहिम खान यांनी प्रास्ताविक केले,ईश्तेयाक ऊल्ला खान यांनी आपला निर्माता कोण? त्याचा परीचय करुन दिला तर अमीनउल्ला खान यांनी नमाज ,अज़ानाचा अर्थ , व मस्जिद चा परीचय करुन दिला.यावेळी मंचावर मौलवी बरकत ऊल्ला,हाजी अब्दुल रहेमान लातूर अफजल गाजी औरंगजेब हुसेन  सै ईफ्तेखार अली इरफान अली मीर साहेब अनेक साधुसंत, मेलडी गृपचे पदाधिकारी सर्व पक्षाचे नेते मंडळी गणमान्य व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाला आलेल्या सर्व नागरिकांना   पुष्पगुच्छ ,अतर, खजुर  व संत तुकडोजी महाराज यांचे एक पुस्तक  सप्रेम भेट  देऊन स्वागत करण्यात आले.कार्यकमाचे संचालन प्रा . अमन इनामदार यानी केले तर  आभार प्रदर्शन वसीम अहमद खान  यांनी केले.तत्पूर्वी रज़ीया बानो मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी या सेवाभावी संस्थे तर्फे समाज प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज तत्कालीन थानेदार संतोष महल्ले आणि एपीआय तेल्हारा हिम्मत बंदी या तिघांना अकोट भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या त्रिमूर्तींचे कार्य वखान्याजोगे असून समाजाला जोडणारे व एकोपा निर्माण करणारे आहे म्हणून आयोजकांनी त्यांची निवड केली तसेच पुढे देखील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी आकोट शहरात शांतता व सुव्यवस्था  प्रस्थापित करण्यासाठी इमाने व इतबारे  प्रयत्न करणार  त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रत्येक वर्षी अकोट भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे अयोजकांनी जाहीर केले...

♦️सद्भावना कार्यक्रम हृदय स्पर्शी व लोकांना जोडणारा....

  सद्भावना कार्यक्रम हृदयांना जोडणारा आहे अश्या कार्यक्रमांची  आज  गरज आहे यामुळे आपल्या मनातील शंका कुशंका दुर होऊन कटुता कमी होते.म्हणून प्रत्येक मस्जिद मध्ये असे  कार्यक्रम झाले  पाहिजेत   मी आयोजकांना धन्यवाद देतो.  माझा व संतोष  महल्ले तसेच हिम्मत दंदी यांचा याठिकाणी सत्कार     करण्यात आला  हे अविस्मरणीय  आहे  संतोष महल्ले  सारख्या  पोलिस अधिकाऱ्यांची आम्हाला फार गरज आहे मी पुनश्च आयोजकांचे आभार मानतो.

                     सत्यपाल महाराज 

                 समाजप्रबोधनकार

♦️माझ्या साठी अविस्मरणीय क्षण...

: विविध समाजा मध्ये झालेला दुरावा कमी करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी अश्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे आयोजकना शुभेच्छा देतो अश्या ठिकाणी थोर समाजसुधारक मा सत्यपाल महाराज याच्या सोबत माझा व हिंमत दंदी यांना अकोट भूषण पुरस्कार दिला.पदावर असताना सर्वच प्रशंसा  करतात आकोट वरून बदली होऊन चार वर्षांनी अकोट भूषण पुरस्कार प्राप्त होणे अविस्मरणीय क्षण आहे.मला माझ्या कार्याची पावती मिळाली अकोट वासीयांचे आभार...

सत्कार मुर्ती

संतोष मनोहरराव महल्ले

Previous Post Next Post