बैलाचे शेतकऱ्यावर ऋण हे न विसरण्यासारखे - आ डॉ संजय कुटे...


 
बैलाचे शेतकऱ्यावर ऋण हे न विसरण्यासारखे - आ डॉ संजय कुटे...

राजेश बाठे/संपादक आर सी २४ न्युज...

जळगाव जामोद बैलाचे शेतकऱ्यावर असणारे ऋण हे न विसरण्यासारखे आहे असे वक्तव्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शहरातील वायली वेस परिसरात बैल जोडी स्मारकाचे लोकार्पण करतेवेळी केले.बैलपोळ्याच्या शुभ दिनी शहरातील वायलीवेस परिसरात बैल जोडी स्मारकाचे लोकार्पण आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते झाले. बैल हा राब राब राबून आपल्या बळीराजाला शेती व्यवसायामध्ये मदत करतो बैला शिवाय शेती होणे शक्य नाही. एक प्रकारे राब राब राबून बैल हा शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालवत असतो त्यामुळे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बळीराजा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो याचेच प्रतीक म्हणून शहरात बैल जोडी स्मारक बांधण्यात आले.बैल आपल्या शेतकरी मालकासाठी उन्हात पावसाळ्यात राब राब राबून शेतीतील उत्पन्न काढण्यासाठी त्याला मदत करत असतो त्यामुळे हिंदू संस्कृतीत बैलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे असे वक्तव्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी यावेळी काढले. या बैल जोडीस स्मारकामुळे वायलीवेस भागाचे सौंदर्य अधिक खुल्ले व जळगाव जामोद च्या सांस्कृतिक ओळखीत एक नवीन अध्याय जोडला गेला.

Previous Post Next Post