सैलानीत शेख नफीज (ऊर्फ)बाब्याच्या खुणाचा थरार...! तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
इंदिरानगर बुलढाणा येथील रहिवासी शेख नफिज शेख हाफिज उर्फ बाब्याला काल रात्री तीन ते चार जणांनी सैलानी येथील बररीवाले बाबा दर्गाह जवळ मर्डर करून संपविले. माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी धाव घेतली. 36 वर्षीय शेख हफीज शेख नफिज उर्फ बाब्या रायपूर जिल्हा परिषद सर्कल साठी तयारी करत होता. त्याच्या खुनाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.येथील इंदिरानगर मधील बाब्या काल अमावस्या निमित्त सैलानी येथे गेला होता. मध्यरात्री नंतर त्याचा मृतदेह सैलानीत आढळून आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाब्या आवडत्या पांढऱ्या ड्रेसमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार बाब्या सैलानीत दाखल झाल्यावर त्याने तिथल्या आपल्या काही साथीदारांना कॉल करून बोलावले होते. “माझी टीप तुम्ही पोलिसांना देता, या तुम्हाला आता चाकूच खूपसतो”, अशा प्रकारची धमकी त्याने मोबाईलवर या लोकांना दिली असल्याचे समजते. समोरचे आरोपी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली आणि आरोपींनी बाब्याला लाकडी राफ्टरने मारहाण करून आणि नंतर चाकू खुपसून संपवून टाकले. घटना सकाळी 7.30ते 8.30 यावेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.या प्रकरणी क्र 146/2025 भा.द.स. कलम 103(1), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
