नांदुऱ्यात ४१ तलवारी जप्त...अप्पर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यात मोठी कारवाई...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरामध्ये अप्पर र पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने दिनांक २० आँगष्ट रोजी सायंकाळी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एका व्यक्तीकडून ४१ तलवारी जप्त करण्यात आल्या आहे.याबाबत बुलडाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी तात्काळ खामगाव येथील अप्पर पोलीस अधिक्षक श्रेणिक लोढा यांना दिली. अप्पर पोलीस अधिक्षक हे स्वःत आपली टीम व स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पो.नि.सुनिल अंबुलकर हे आपली टीम घेऊन नांदुऱ्याकडे रवाना झाले. नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम रा. शाहीण कॉलणी नांदुरा याने त्याचे शाहीण कॉलणी, नांदुरा येथील राहते घरात अवैध रित्या धारदार तलवारी विक्री करण्यासाठी मोटार सायकल वर घेवुन जाणार अशा माहीतीवरुन पोलिसांनी शाहीण कॉलणी येथे जावुन मिळालेल्या माहितीनुसार शेख वसीम शेख सलीम याचे घराचे बाहेर जावुन पाहीले असता आरोपी शेख वसीम शेख सलीम हा त्याची पल्सर मोटार सायकल क्रमांक एम. एच २८ बि.एन २२७७ वर एक पांढऱ्या रंगाच्या पोतडीचा लांब गठ्ठा गाडीवर ठेवुन बसण्याचे तयारीमध्ये दिसला. पोलिसांनी त्याचे घराचे लोखंडी गेटच्या आतमध्ये जावुन त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख वसीम शेख सलीम वय ३३ वर्ष रा.शाहीण कॉलणी नांदुरा असे सांगीतले. यावेळी त्याची झडती घेतली असता झडती मध्ये एकुण ४१ तलवारी किंमती ८२,०००/-रुपयाच्या मिळुन आल्या. तसेच सदर आरोपीने गुन्हयात वापरलेली काळया रंगाची पल्सर १२५ सि.सी किंमती ८०,००० रुपये व त्याचा जुना वापरता व्हिओ कंपनीचा चॉकलेटी रंगाचा मोबाईल किंमती २०,००० असा एकूण १,८२,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख वसीम शेख सलीम वय ३३ वर्ष रा. शाहीण कॉलणी नांदुरा यास ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात आर्म अँक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई नांदुरा पोलीस करीत आहेत.
