बुसुंधरा समरक्षण फाउंडेशन व अँटी क्राईम ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र प्रदेश पदांवर नविन नियुक्त्या...!
जळगाव जामोद प्रतिनिधी...
बसूनधरा संरक्षण फाउंडेशन आणि अँटी क्राईम ऑर्गनायझेशन या संस्थांच्या महाराष्ट्र प्रदेश पातळीवरील पदांवर नविन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष खय्यम शफिक अन्सारी (दहेली) यांच्या हस्ते आज जळगाव जामोद येथे झालेल्या कार्यक्रमात शेख सईद शेख कदीर यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी तर लियाकत खान सबदर खान यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी तसेच सय्यद युसुफ सय्यद मुसा विदर्भ अध्यक्षपदी व हाफिज अब्दुल सत्तार यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी व वर्षा ताथारकर यांची महिला बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.ही संघटना संपूर्ण भारतात कार्य करतो संघटनेमार्फत समाजात गुन्हेगारी विरोधात जागृती पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक न्याय साठी सातत्याने उपक्रम राबविले जातात या संघटनेची संपूर्ण भारतात टीम सक्रिय आहे.या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या. यावेळी शेख अस्लम शेख समद, अनिल पारवे, मझहर शेख, वर्षाताई ताथारकर, हाफिज मोहम्मद सलीम, शौकत खान, प्रज्वल मानकर, शेख रसूल, व संघटनाचे इतर सैकळो कार्यकर्ता उपस्थित होते