गाडेगाव खुर्द चे सुपुत्र देशसेवेहुन परत आल्याने गावभर उत्सव साजरा... शिवसेना तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांनी केले भव्य स्वागत...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
गाडेगाव खुर्द नगरीचे सुपुत्र वीर जवान अमित कुमार चंदनगोळे हे भारतीय सेनेमध्ये प्रदिर्घ देशसेवा करुन सेवानिवृत्त झाले.त्याचे आज दिनांक ३ आँगष्ट रोजी त्यांची जन्मभूमी गाडेगाव खुर्द नगरी मध्ये आगमना प्रसंगी गावातील रस्ते रांगोळ्यांनी सजले होते.गावात उत्सवाचे आनंदाचे वातावरण होते.भारत मातेचे वीर सुपुत्र अमित कुमार चंदनगोळे हे गावात येणार आहेत हे माहीत होताच गावकऱ्यांनी उत्साहात स्वागतासाठी विशेष तयारी केली होती.गावात दाखल होताच मोठ्या उत्साहात आनंदात त्यांची गावभर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव जामोद तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून भारत मातेचे वीर सुपुत्र अमित कुमार चंदनगोळे यांचे स्वागत केले.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.