तात्काळ रस्ता दुरुस्ती करा - वंचित बहुजन आघाडी ची मागणी....
जळगाव जामोद प्रतिनिधी....
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता यांना वडगाव पाटण,तरोडा बुद्रुक , तरोडा खुर्द आणि कुरणगाड या गावातील रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे दिनांक ४ आँगस्ट रोजी करण्यात आली. गावातील नागरिक मोठ्या संख्येने निवेदन देताना उपस्थित होते. या गावांमध्ये दळणवळण मार्ग हा अत्यंत खराब आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या येण्या साठी , रुग्णांसाठी नाहक त्रास होतो त्याअनुषंगाने रस्ता असणे महत्त्वाचे आहे.जर दळणवळण साधनाचा मार्ग जर आमच्या मागणीने मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांनी दिला.निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रमेश नाईक ,ज्येष्ठ नेते रामकृष्ण रजाने,तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई सर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग, महिला जिल्हा उपाध्यक्ष पार्वताबाई इंगळे,तालुका सचिव साहेबराव भगत,युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे,युवा नेते स्वप्निल गवई रामकृष्ण तायडे,देवानंद दामोदर, अताउल्ला खान , विजय तायडे जिल्हा उपाध्यक्ष,जयकुमार डोंगरदिवे, नारायण पवार , महिला तालुकाध्यक्ष सुनीताताई हेलोडे,शहर अध्यक्ष सोनम ताई वानखडे, मंगलाताई पारवे, ताराबाई तायडे,तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे तालुका उपाध्यक्ष हरिदास वाघमारे उपाध्यक्ष राजेश तायडे, तालुका उपाध्यक्ष दिलीप तायडे, रतन नाईक ,रवींद्र नाईक तालुका सचिव असमत खान तालुका सचिव सुरेश वाघोदे, गुणवंत मेटांगे दामू सपकाळ, ज्ञानेश्वर कोकाटे, भीमराव वाघ ,सुदाम गवई, विजय सातव, प्रभात पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, अमोल तायडे, मुकेश पवार, महेंद्र जाधव, रामभाऊ तायडे, राजाराम पवार, लोकपाल भगत ,कडू भगत, बुद्धभूषण वाघोदे, अशोक दाभाडे, सुपडा बांगर, बाबुराव पवार सरपंच तरोडा, भास्कर भगत,बाळू तायडे,आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.