जळगाव शहरातील शेतकऱ्याचा मुलगा झाला विद्युत सहाय्यक...


 
जळगाव शहरातील शेतकऱ्याचा मुलगा झाला विद्युत सहाय्यक...

जळगाव जा प्रतिनिधी:- 

जळगाव जामोद नगरीतील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या अमोल  नारायण शिरसागर यांची महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक या पदावर निवड झाली आहे.अमोल शिरसागर हे जळगांव जामोद येथील रहिवासी असून अतिशय गरीब कुटुंबातील  आहेत.व १० वी पास झाल्यावर अमोल याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था संग्रामपूर येथे वीजतंत्री या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले आय टीआय करत असताना अमोल याने पेपर वाटण्याचे आणि डॉ आदित्य जाधव सर यांच्या दवाखान्यात रुग्ण नोंदीचे  सुद्धा काम केले आहे. त्यांचे वडील यांनी महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 34 वर्ष सेवा दिली आहे.  अमोल च्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्ष होत आहे.आपल्या यशाचे श्रेय त्यांनी  आपले आई-वडील डॉक्टर जाधव सर आणि महावितरण मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ असलेले अविनाश गिरी यांना दिले आहे.

Previous Post Next Post