राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील कुलगणा खुर्द येथील प्रविण सुखराम बेलसरे वय १६ यांचा वाघाच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १९ आँगष्ट रोजी सकाळी उजेडात आली आहे तर त्यांच्या सोबत असलेला व्यक्ती गोंविद गोपाल कास्देकर वय १८ यांचा शोध सुरू आहे.दिनांक १८ आँगष्ट रोजी आपली गुरेढोरे चारण्यासाठी हे दोघेजण जंगलात निघून गेले होते.संध्याकाळ झाली तरी हे दोघेजण घरी आले नाही त्यामुळे त्यांच्या पालकांनी व गावकऱ्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली तरी दोघेजण मिळून आले नाहीत अखेर आज दिनांक १९ आँगष्ट रोजी त्यातील प्रविण बेलसरे वय १६ या तरूणाचा मृतदेह जंगलात मिळुन आला आहे तर सोबती गोविंद कास्देकर अद्याप मिळुन आलेला नाही..घटनास्थळी वनविभाग चे अधिकारी व चिखलदरा पोलिस दाखल
