बापूमिया सिराजुद्दीन पटेल महाविद्यालय मध्ये अध्यक्ष एडवोकेट सलीम पटेल यांच्या हस्ते ध्वजारोह संपन्न..स्वातंत्र दिवस,"देश विभाजन" या नाटकाने साजरा..
मंगल काकडे/पिंपळगाव काळे...
स्थानिक बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिवस देश विभाजन हे नाटक करून साजरा केला.सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुंबई येथील जे जे हॉस्पिटलचे माजी उप अधिष्ठाता डॉ सादिक पटेल यांनी स्वातंत्र्य दिवसानिमित्त संपूर्ण महाविद्यालयाला शुभेच्छा पर संदेश पाठविला महाविद्यालयातील शिक्षकांच्या वतीने महाविद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास कटीबद्ध आहे. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची मेहनत हीच संस्थेची ताकद आहे. स्वतंत्र दिवसानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा संदेश प्राचार्य डॉ शेख फराह यांनी वाचून दाखविला. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट सलीम पटेल यांनी शिक्षकांनी महाविद्यालयात केलेल्या विविध कामाबद्दल कौतुक केले व भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन प्रगती करण्याचे आव्हान केले.ब्रिटिशांनी देशाची फाळणी कशी केली आणि फाळणी होत असताना लोकांनी आपले घरदार सोडून पळ काढला. त्यामध्ये हजारो लोकांच्या हत्या झाल्या याचे विदारक चित्र या नाटकांमध्ये दाखविले आहे. देश कसा स्वतंत्र झाला याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी देश विभाजन हे नाटक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले.या नाटकाच्या प्रमुख भूमिकेमध्ये विठ्ठल रोठे, सुरेखा अवचार,नेहा भोपळे, अनुप वेरूळकर, तर गायन प्रतीक्षा अवचार व वैष्णवी भगत यांनी केले.या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे संचालक सिराजोद्दीन पटेल, पळशीचे उपसरपंच निलेश भोपळे, दिवाणसिंग राजपूत, दरबार सिंग राजपूत, संतोष पाटील व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ बाबाराव सांगळे व प्रा जितेंद्र कचवे यांनी केले.
