कुलगंणा येथिल वाघाच्या हल्ल्यांत मरण पावलेल्या प्रविण यांच्या घरी खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली भेट....
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील कुलगंणा खृद येथिल प्रवीण सुक्राम बेलसरे१७ हा मुलगा दि.१८//८/२०२५ ला आपले गुरे घेवून जंगलात चर ई करण्यासाठी गेला असता अचानक प्रविण बेलसरे यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला चढविला व त्याला जागेवरच सपंविले तसेच त्याच दिवशी कुलगंणा येथिल आनंद रामकिशन मावस्कर ८ वर्षाचा मुलगा पाण्यात वाहून गेला असता त्यांचा मृत्यू झाला.अमरावती जिल्हा चे खासदार बळवंत वानखेडे यांना माहिती मिळताच खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रविण सुखराम बेलसरे व आनंद रामकिशन मावस्कर यांच्या राहत्या घरी दि.२२/८/२०२५ रोजी भेट दिली.तसेच वस्तापुर बिट चे RFO आलोकर मॅडम यांच्या सोबत वाघाच्या हल्ल्यांत मरण पावलेल्या प्रविण याला वनविभाग मार्फत कशा पद्धतीने मदत होईल या बाबतीत खासदार बळवंत वानखेडे यांनी RFO मॅडम यांच्या शी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.तसेच प्रविण यांच्या आईच्या म्हणण्यानुसार वनविभागाने माझा घरचा एक व्यक्ती वनविभागात कामावर लावावे असे प्रविणची आईने खासदार बळवंत वानखेडे यांना म्हटले आहे.
याच प्रकरणा बद्दल खासदार बळवंत वानखेडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अमरावती रेड्डी साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून बातचित केली असता मयत प्रविण च्या घरातील एका व्यक्तीला रोजंदारीवर कामावर लावणार असल्याचे खासदार बळवंत वानखेडे यांना म्हटले आहे.तसेच चिरंजीव आनंद रामकिशन मावस्कर हा पाण्यात वाहून गेला असता याला ही शासनाने काही मदत करावी या बाबतीत पण महसूल विभाग व शिक्षण विभागाशी खासदार बळवंत वानखेडे यांनी दुरध्वनी द्वारे संपर्क साधला आहे.
खासदार बळवंत वानखेडे यांचा कुलगंणा खुर्द गावात भेटी दरम्यान माजी जिल्हा परिषद सभापती दयाराम काळे, महेंद्रसिगं गैलवार, युवक काँग्रेस कमिटी महाराष्ट्र महासचिव राहुल येवले, काँग्रेस कमिटी चिखलदरा तालुका अध्यक्ष सहदेवजी बेलकर, उपाध्यक्ष संजय बेलकर, काँग्रेस कार्यकर्ते कृष्णा राजणे, हेमराज बावणेकर,राकेश झारखंडे, असे बहुसंख्येने काँग्रेस कार्यकर्ते कुलगणा गावातील सरपंच उपसरपंच तसेच सदस्य गण उपस्थित होते.


