गौलखेडा बाजार येथे बैलपोळा सण परंपरा व संस्कृती जोपासून अत्यंत उत्साहाने साजरा...शेतकरी पोळा या सनाची पाहतात आतुरतेने वाट...

गौलखेडा बाजार येथे बैलपोळा सण परंपरा व संस्कृती जोपासून अत्यंत उत्साहाने साजरा...शेतकरी पोळा या सनाची पाहतात आतुरतेने वाट...

राजु भास्करे/ अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

सातपुड़ा पर्वताच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मेलघाटातील निसर्गरम्य स्थान गौलखेडा बाजार येथे शुक्रवारी  संध्याकाळीचा वेळी दरवर्षी प्रमाणे सर्वधर्म समभाव विविधतेत एकता प्रस्थापित करणारी शेकड़ो वर्षापासुन परंपरा आणी धार्मिक संस्कृती जोपासून बैलपोळाचा सण अत्त्यंत उत्साहाने साजरा केला जातो. तंत्रज्ञान असल्यामुळे बैलजोड्याची जागा आता ट्रैक्टर ने घेतल्यामुळे व लम्पी आजारामुळे अनेक शेतकर्यांचे बैल दगावल्यामुळे  बैलजोड्यांची संख्या घसरनिवर आले. या बैल पोळ्याचा दिवशी सर्वप्रथम बैलांना पारंपारिक पद्धतीने व संस्कृती जोपासून नदीवर नेऊन त्यांचा चांगल्या प्रकारे अंघोळ घातले जाते. या दिवशी आपला बैल सर्व बैलात उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाने त्याचा आनंदाचा साजशृंगार करतात. बैलांना देव माननारे शेतकरी हळद आणी गरम पाण्याने खांदे शेकतात व त्यांची पूजा केली जाते.


 त्यानंतर त्यांचा शिंगाला रंगरंगोटी करून हिंगुळ लाउन त्यावर बेगड़ पट्ट्या लावतात. वाखाची किवा सुताची नवी मोरखी, नवा कांडा, नवी वेसन, नवा कासरा, नवीन झालर, दोरजोळ, हार, फुले, तुरे सगळे काही नवीन रंगीत असते. तसेच घुँघरूमाळा घालून सजवले जातात, व हा बैलपोळा गौलखेडा बाजार येथील हनुमनाच्या मंदिरात पूजा करून त्या परिसरात दरवर्षी आंब्याचा पाणाचा तोरणाच्या खाली ठेवतात व गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलिस पाटिल, सरपंच, गाव कोतवाल, तंटामुक्ती समिती हे सर्व बैलांची पूजा करतात व पूजा झाल्यानंतर तोरण तुड़वतात आणी संपूर्ण गावात मिरवनुक काढतात हे दृश्य नयनरम्य भासते. पोळ्याचे महत्व् शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतने वाट पाहत असतात अश्या प्रकारे गौलखेडा बाजार या गावात दरवर्षी पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Previous Post Next Post