जळगाव जामोद प्रतिनिधी-
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्याचा योग्य लाभ घेता यावा नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी दिनांक 1 ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात महसूल सप्ताह 2025 साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने महसूल विभागाच्या वतीने सुनगाव येथे कार्यक्रम एस डी ओ शैलेश काळे व नायब तहसीलदार श्री किटे तसेच जामोद मंडळ अधिकारी श्री शिंदे यांच्या उपस्थितीत दिनांक 3 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण संपन्न झाला. याप्रसंगी एस डी ओ शैलेश काळे व सूनगाव चे सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले, यावेळी शालिग्राम भगत तंटामुक्ती अध्यक्ष ,ग्रामपंचायत सदस्य पती दिनेश ढगे, दीपक राजपूत ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक,शेतकरी बंधू हजर होते ग्राम महसूल अधिकारी जी डी वाघ , राकेश चौरे, वाजपेयी भूमी अभिलेख विभाग जळगाव,सेवानिवृत्त कोतवाल शालिग्राम ढोले महसूल सेवक सचिन कपले हे सुद्धा यावेळी उपस्थित होते..