बोकड चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक व सुटका...


 
बोकड चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक व सुटका...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

सुनगाव परिसरामध्ये चोरीच्या घटना सातत्याने घडत असून अशीच एक चोरी दिनांक १९ जुलै च्या रात्री घडली होती. गावातील गणेश नथ्थु पाटील हे आपल्या परिवारासह चिखलदरा येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी जाण्याच्या अगोदर आपली गुरेढोरे व बकऱ्या गोठ्यामध्ये बांधून गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी संधीचा फायदा घेत गणेश पाटील यांचे दोन बांधलेले बोकडे चोरी गेले होते.बोकड चोरीची तक्रार गणेश पाटील यांनी दिनांक २० जुलै रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने. सुनगाव बीट जमदार शेख इरफान व त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांनी बोकड चोरी प्रकरण गांभीर्याने घेत बोकड चोरीचा तपास सुरू केला चोरांचा सुगावा लागताच त्यांनी सुनगाव येथीलच अमोल काशिराम भगत याला अटक केली संबंधित घटनेबद्दल विचारणा केली असता आरोपी अमोल भगत हा उडवा उडवी ची उत्तरे देत होता पोलिसांनी पोलिसगिरी दाखवतात आरोपी अमोल भगत हा कबूल झाला व त्याने त्याचा साथीदार निखिल अशोक पाटील यांच्या मदतीने बोकड चोरल्याची कबुली दिली.अमोल काशीराम भगत व निखिल अशोक पाटील या बोकड चोरी प्रकरणातील आरोपींना दिनांक ४ ऑगस्ट रोजी पोलीस नाईक शेख इरफान व सहकारी संदीप रिंढे यांनी अटक केली त्यांच्या विरोधात जळगाव जाऊन पोलिस स्टेशनला कलम ३०३(२)३(५) भारतीय न्यायसहितेंनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची समजपत्र देऊन सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे मार्गदर्शनात पोलीस नाईक शेख इरफान करीत आहे.

Previous Post Next Post