बी एस पटेल महाविद्यालयामध्ये हर्बल मेडिसिन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न...


बी एस पटेल महाविद्यालयामध्ये हर्बल मेडिसिन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

स्थानिक पिंपळगाव काळे येथील बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.सलीम पटेल साहेब यांच्या प्रेरणेने व सहसचिव श्री रब्बानी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतीशास्त्र विभाग व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हर्बल मेडिसिन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. झेबा इमरान लाभल्या होत्या. डॉ. झेबा यांनी आपण आयुर्वेदापासून कसे दूर जात आहोत आणि ऍलोपॅथी मेडिसिनचा आपल्यावर होणारा अतिरेक यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी आपल्या सभोवताली असलेल्या अनेक औषधीय वनस्पती बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणत्या मेडिसिनल वनस्पती असाव्यात यावर सुद्धा मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संबोधन करताना त्यांनी आपल्या घरामधील तसेच स्वयंपाक घरातील विविध औषधीय वनस्पती जसे कोरफड तुळस जास्वंद आद्रक हळद दालचिनी, लवंग मिरी अशा अनेक वनस्पती बद्दल आणि त्याच्या औषधीय गुणधर्माबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाकडे वळले पाहिजे आणि या औषधीय गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा वापर हा आपल्या पिढी मधून पुढच्या पिढी मध्ये कसा जाईल याचे सुद्धा विचार मंथन केले पाहिजेत जेणेकरून आपली हजारो वर्ष चालत आलेले आयुर्वेदिक परंपरा ही अशी समोर चालू राहील आणि आपल्याला आपले स्वास्थ्य उत्तम आणि दीर्घायुष्य करण्यासाठी मदत होईल असेही मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ. फराह शेख मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना वनस्पतीशास्त्र विषयांमध्ये तसेच विद्यापीठाने बनवलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना विविध औषधीय वनस्पतीची माहिती होण्यासाठी इंडियन नॉलेज सिस्टीम या नावाचा एक पेपर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे असे निदर्शनास आणून दिले. पुढे त्या म्हणाल्या की निसर्गामध्ये अशा अनेक औषधी वनस्पती आहेत की ते आपले दैनंदिन जीवनातील स्वास्थ चांगल्या ठेवण्यास मदत करतात जे साथीचे रोग असतील वातावरण बदलामुळे निसर्गात येणाऱ्या नवीन  आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात अशा वनस्पतीचे सेवन आपण नेहमी आपल्या आहारामध्ये ठेवले पाहिजेत तसेच विविध वनस्पती औषधांचा काढा सुद्धा आपण घेतला पाहिजे जेणेकरून आपण छोट्या-मोठ्या आजारांना बळी पडणार नाही आणि ऍलोपॅथिक मेडिसिन कडे आपण जास्त आकर्षित होणार नाही त्यामुळे आपले स्वास्थ हे चांगले राहील असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी हळद अडुळसा जास्वंद आवळा असा विविध वनस्पतींचे औषधी गुणधर्म विद्यार्थ्यांना सांगितले.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी.आर. सिरसाठ तसेच आभार प्रदर्शन प्रा . पी . एन.बाठे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post