वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन...


 
वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

दिनांक 19/8/2025 मंगळवार रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आलेले आहे. सविस्तर वृत्त असे की 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनी जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात पूर्ण नदीपात्रात विनोदजी पवार हे जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी ते लढा देत होते. लढा देत असताना त्यांना अखेर पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन स्वतःला संपवावे लागले. असा हा लढवय्या विनोदजी पवार हे लढता लढता संपले. परंतु यानंतर विनोद पवार यांच्या परिवाराच्या न्याय हक्कासाठी आज उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये शहीद विनोद पवार यांच्या परिवारातील दोन सदस्यांना शासकीय सेवेमध्ये सामील करण्यात यावे, त्यांच्या परिवाराला एक कोटी शासकीय आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल व्हावे या तीन मागण्यासह निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय समता माळी परिषद जळगाव जामोद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट सामाजिक संघटनांचा सुद्धा पाठिंबा मिळाला. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष भीमराव तायडे, महिला जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग, युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर, जिल्हा महासचिव एडवोकेट अनिल ईखारे, जिल्हा प्रवक्ता एडवोकेट रवींद्र भोजने, जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे, तालुकाध्यक्ष रमेश नाईक, जळगाव जामोद, तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई, तालुका सचिव ,जिल्हा सदस्य स्वप्निल गवई, संगीता इंगळे भारतीय बौद्ध महासभा महिला तालुकाध्यक्ष,रतन नाईक देवानंद दामोदर  आदी सर्व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post