हजारो ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन..कारवाई करण्याची जिल्हा शिवसेनाप्रमुख गजानन वाघ यांची मागणी...
जळगाव (जामोद) प्रतिनिधी...
सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत करणवाडी ते खांडवी आणि जळगाव, जामोद, टूनकी, जिल्हा सीमा हा ६०० कोटीपेक्षा अधिक अंदाजपत्रकीय रस्त्याचे काम सध्या फार जोरात सुरू आहे. हे काम पुणे येथील राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करत आहे. या कन्स्ट्रक्शन कंपनी जळगाव ते सूनगाव मार्गावर खेलबारी येऊल यांचे गट १४ क्रमांकाचे शेत अधिग्रहण करून तेथे आणि जवळच रसुळपुर येथे हजारो ब्रास गौण खनिजांचा खनिजाचा साठा केला असून तिथे विनापरवानगी स्टोन क्रशर सुद्धा सुरू केले आहे. ह्याच कंपनीचे जळगाव जामोद उपविभागात अन्य ठिकाणी पण बिना परवानगीचे स्टोन क्रशर सुरू आहेत. त्यांच्या अंदाजपत्रकाला दोन खनिजाचा लिड फार लांबचा असेलही परंतु ते चार ते पाच किलोमीटर परिसरात गौण खनिजाचे क्रसिंग करून आपल्या बांधकामांमध्ये वापरतात. ती शासनाची शुद्ध फसवणूक आहे. विनापरवानगीने गौण खनिज क्रश करून शासनाची फसवणूक आणि दिशाभूल करतात.. तालुक्यात सर्वात जास्त खोल खोदकाम वायाळ खदान आणि इस्लामपूर परिसरात शासकीय नियमापेक्षा जास्त खोलीवर खोदकाम करून गौण खनिज काढल्या जाते. तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी आणि कंत्राटदारांचे साठे लोटे आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य गौण खनीज उत्खन करणारे आणि विना परवानगीने गौण खनिजाचे क्रेशर चालवणाऱ्या कंट्रकदारावर तात्काळ कारवाई करावी, असे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी राज्याच्या महसूल मंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत दिनांक १४ ऑगस्ट रोजी दिले आहे. वडगाव गड, इस्लामपूर, रसलपुर, वायाळ, सुनगाव आदि परिसरातील खनिज काढणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली नाही तर शिवसेना उपविभागीय कार्यालयाला २० ऑगस्ट रोजी घेराव घालून आंदोलन करू असा इशारा सुद्धा निवेदनकर्त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा खानिजकर्म अधिकारी,उपविभागीय अधिकाऱ्यांसह अंबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
