भरधाव वेगाने येणाऱ्या इको गाडीने पादचाऱ्यास उडविले.. घटनास्थळीच मृत्यू...


 
भरधाव वेगाने येणाऱ्या इको गाडीने पादचाऱ्यास उडविले.. घटनास्थळीच मृत्यू...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

भेंडवळ मडाखेड रस्त्याने पैदल चालत जाणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धास भरधाव वेगाने येणाऱ्या इको गाडीने उडवून गंभीरित्या जखमी झाल्याने घटनास्थळीच वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक ७ आँगष्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम भेंडवळ येथील रहिवासी असलेले सतिष दौलत भारसाकडे यांचे वडील दौलत भारसाकडे वय ७५ वर्ष हे भेंडवळ मडाखेड रस्त्याने पैदल चालत जात असताना रतन वक्टे यांचे गॅरेज समोर  इको वाहन  एम एच २८ बी डब्लू २५९६ क्रमांकाच्या गाडीने पाठीमागून येऊन धडक देऊन गंभीररित्या जखमी केले. त्या अपघातात दौलत भारसाकडे घटनास्थळी च दुर्दैवी मृत्यू झाला असून ईको गाडी चालक संतोष अशोक बावस्कर राहणार चावरा वय ३० वर्ष याने निष्काळजीपणे वाहन चालवून दौलत भारसाकडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले असल्याची तक्रार मुलगा सतीष दौलत भारसाकडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने आरोपी संतोष बावस्कार याच्या विरोधात अप क्र.३७७/२०२५ कलम २८१,१०६(१) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करून गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे. दौलत भारसाकडे यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.

Previous Post Next Post