क्रांतीदिनाचे औचित्य साधुन ऑपरेशन सिंदुर मधील सैन्यांच्या शौर्याला सलाम...! केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले शिबिराचे उद्घाटन...!
बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी...
ऑपरेशन सिंदुर अंतर्गत भारतीय सेनादलातील सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंदुर महारक्तदान शिबिरात जमा होणारे रक्त हे जवानांच्या शौर्याचे प्रतिक राहणार असल्याचे मत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.जम्मू काश्मिर येथिल AIIMS एम्स आर्मी कमांड हॉस्पीटल येथे सांगली जिल्हयातील शिवसेनेच्यावतीने भारतीय सेना दलातील शूर सैनिकांच्या सन्मानार्थ क्रांतीदिनाचे व रक्षाबंधनांचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन 9 ऑगस्टला करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, सांगली जिल्हयाचे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रहार पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलतांना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने भारतीय सैनिकांना समर्पणात्मक पाठींबा दर्शविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाला सलाम, सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या महारक्तदान शिबिरामध्ये सांगली जिल्हयातील 1000 तरुण रक्तदान महायज्ञात सहभागी होणार आहे. त्यामुळे मी चंद्रहार पाटील व त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा सेवाभाव घेउुन नेहमीच शिवसेनेच्या वतीने पीडीतांना मदत करण्याची भुमिका घेतली जाते शिवसैनिक निस्वार्थपणे प्रत्येकाला मदत करतो. हि शिवसेनेची समाजाप्रती असलेली बांधीलकी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.