जळगांव जामोद तालुक्यात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजणे अंतर्गत कार्यशाळा संपन्न....
जळगाव जामोद प्रतिनिधी...
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग,व कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ३१/०७/२०२५ रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद येथे केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत नव उद्योजक, महीला शेतकरी गट, शेतकरी गट यांचे साठी कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले.सदरील कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी जळगांव जामोद यांनी केले.सदरील कार्यशाळा मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील तज्ञ मार्गदर्शक शामसुंदर बोर्डे विषय विशेषज्ञ विस्तार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले असून त्यांनी योजनची पार्श्वभुमी, योजनेतील मुख्य घटक या विषयी उपस्थीतांना मार्गदर्शन केले. जळगांव जामोद तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक व त्या सोबतच उद्योग निर्मीती ,उद्योजकाची घडण,उद्योगाची दशा व दिशा,बँक सिव्हिल कसा वाढवणे व त्याचप्रमाणे उद्योगासाठी उद्योजकाची अंगी आवश्यक कौशल्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.शशांक दाते विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांनी अन्न हाताळणी, स्वच्छता तसेच अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे आवश्यक परवाने याबाबत उपस्थीतांना माहीती दिली.डि.आर.पी विजय अस्वार यांनी बिज भांडवल या घटकांतर्गत लघु व कुटीर उद्योग बाबत व अर्ज प्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले. वाणी नांदुरा यांनी उद्योगासाठी लागणा-या मशीनरीज याबाबत उपस्थीतांना मार्गदर्शन केले.कार्यशाळे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपकृषी अधिकारी शिंदे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आत्मा योजणेचे स.त.व्यवस्थापक सागर राऊत व कृषी विभागाचे सर्व उपकृषी अधिकारी,सहायक कृषी अधिकारी यांनी परीश्रम घेतले.कार्यशाळेला तालुक्यातील बहुतांश उद्योजक,महीला गट , तरुण,व शेतकरी उपस्थित होते, सरतेशेवटी उपस्थित बहुतांश महीला व युवा तरुण यांचे अर्ज भरुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.