निवाना सावळा रस्ताचे तीनतेरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना होतोय त्रास...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
मागील वर्षी 2024 मधे चांगेफळ निवाणा ते सावळा ते जामोद हा रस्ता मंजूर होऊन जामोद ते सावळा काम पूर्ण झालं असून सावळा ते चांगेफळ निवाणा हा रस्ता अपूर्ण आहे मागील वर्षी उन्हाळ्या मध्ये या रस्त्याचे काम सुरू केले अर्धा रस्ता होऊन बाजूला रस्त्यामध्ये भरती टाकून काम अपूर्ण राहिले त्यामध्ये सावळा गावाजवळील 1 किमी रस्ता आणि चांगेफळ खुर्द येथून मेन रस्त्या पासून 1 किमी रस्ता हा अपूर्ण आहे. या रस्त्यामुळे सावळा येथून विद्यार्थी आणि गावकरी कोणत्या सुविधा अभावी पायी ये जा करतात. रस्ता खराब असल्यामुळे विद्यार्थीचे पावसामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे,कितीतरी विद्यार्थी सायकल वरून पडून जखमी झाले,अंगावर खराब पाण्याचे शिंतोळे उडाल्यामुळे कितीतरी वेळेस विद्यार्थी हे शाळेत न जाता घरी परतले त्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान झाले, रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या यासंदर्भात सविस्तर माहिती निवेदनात पुंडकर साहेब उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांना देण्यात आली. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून देण्यात यावे अन्यथा 15 ऑगस्ट रोजी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना यांच्या वतीने विद्यार्थी, गावकरी यांना घेऊन साचलेल्या पाण्यात मधे बसून आंदोलन करण्यात येईल. निवेदन देताना संतोष भाऊ दांडगे शिवसेना तालुकाप्रमुख जळगाव जामोद, युवासेना तालुकाप्रमुख संग्रामपूर प्रशांत इंगळे,अक्षय बगाडे युवा सेना शाखाप्रमुख,मोहन कांडेलकर,गणेश बगाडे,प्रमोद कंडारकर यादी शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.