आ.अबु आसिम आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना जळगावात फळ वाटप...


 
आ.अबु आसिम आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना जळगावात फळ वाटप...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

समाजवादी पार्टी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने आज दिनांक ८ आँगष्ट रोजी समाजवादी पार्टीचे नेते महाराष्ट्र विधानसभा सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसीम आझमी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यासह विविध उपक्रम राबवुन आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वाखाली  साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस, समाजवादी पार्टीचे जळगाव जामोद तालुकाध्यक्ष मुस्ताक जमदार,शेख अजमत,शेख अवेस, अब्दुल साबीर,असलम मौलाना, शेख रईस, सय्यद कमर,जकी खान यांच्यासह तालुका भरातील समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते.

Previous Post Next Post