हिवरखेड उपकेंद्र दोन मध्ये स्तनपान सप्ताह साजरा....
प्रशांत भोपळे/हिवरखेड....
स्तनपान सप्ताह निमित्त हिवरखेड येथील उपकेंद्रात स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय वैद्यकीय अधिकारी झापे उपस्थित होते त्यांनी स्तनदा व गरोदर मातांना बालकाच्या विकासासाठी व रोगप्रतिकारशक्तीसाठी योग्य ते लसीकरणकरणे व पोषण आहाराचे मार्गदर्शन केले बालकांना योग्य सखच पूरक आहार कसा व किती प्रमाणात किती वेळा द्यायचा याचेहे समजून सांगितले. आशाताईंनी पोषण आहार प्रदर्शन करण्यात आले त्यावरून सकस आहाराची माहिती दिली. स्तनपान सप्ताह साठी आरोग्य सेविका आर एस नागपुरे आरोग्य सेविका जे डि भड आरोग्यसेवक धोडरे व आरोग्य सेवक चवात हे यांनी परिश्रम घेतले