आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य कायम...१५३ नागरिकांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार...स्वातंत्र्यदिनाला कचरा नेऊन जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयात टाकणार!----- भाऊसाहेब बावणे

आठवडी बाजार परिसरात घाणीचे  साम्राज्य कायम...१५३ नागरिकांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार...स्वातंत्र्यदिनाला कचरा नेऊन जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयात टाकणार!----- भाऊसाहेब बावणे

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य — १५३ नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार...नगर परिषदेच्या निष्काळजी अधिकाऱ्यांविरोधात संतप्त नागरिकांचा इशारा — स्वातंत्र्यदिनाला कचरा नेऊन जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयात टाकणार!नांदुरा शहर आणि आठवडी बाजार परिसर गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः घाणीच्या साम्राज्यात बदलला आहे. रस्त्यांवर व नाल्यांमध्ये साचलेला कचरा, दुर्गंधी, डास व कीटकांचा प्रादुर्भाव — या सर्वामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढावले आहे.तक्रारींचा पाऊस पडूनही नगर परिषदेतील मुख्याधिकारी, आरोग्य अभियंता, आरोग्य निरीक्षक, बांधकाम अभियंता आणि मुख्य लिपिक यांनी कानावर हात ठेवले आहेत. १५३ नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून स्पष्ट इशारा दिला आहे —

 “आठवडी बाजार परिसराची व शहराची नियमित स्वच्छता न केल्यास, स्वातंत्र्य दिनी शहरातील घाणकचरा थेट जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयाच्या आवारात टाकू!”

कायदा सांगतो, पण पालिका ऐकत नाही!

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे की, घनकचरा वैज्ञानिक पद्धतीने संकलित, प्रक्रिया व विल्हेवाट लावला जावा. तसेच सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. भारतीय संविधानाचे कलम २१ (जीवनाचा अधिकार) आणि मानवाधिकार संरक्षण कायदा १९९३ कलम १२(एच) यांचा उघड भंग होत आहे. पण नांदुरा नगर परिषद मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.

शासनाचा कोट्यवधी निधी कुठे?

कोट्यवधी रुपये खर्च होऊन देखील शहराची अवस्था सुधारली नाही. नागरिकांचा थेट आरोप — “नगर परिषदेच्या भ्रष्ट आणि बेजबाबदार कारभारामुळे निधी लाटला जात आहे आणि शहर घाणीत बुडाले आहे!”

नांदुरा नागरिकांनी आता उघड इशारा दिला आहे की, यावेळी केवळ लेखी तक्रारींवरच थांबणार नाहीत, तर प्रत्यक्ष कचरा आंदोलन करून प्रशासनाला जाग आणणार! असल्याचे नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे.आपल्या निवेदनात नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापना बाबत आज पर्यंत करण्यात आलेल्या सर्व तक्रारी तात्काळ निकाली काढण्या बाबत

२) नांदूरा शहर आणी शहरातील मुख्यत, आठवडी बाजार पारीसरातील घाण नियमीत स्वच्छ न केल्यास

राष्टीय सन, उत्सव अथवा कोणत्याही दिवशी जिल्हाधिकारी तथा नगर परिषद कार्यालयात शहरातील घान कचरा टाकुन आंदोलन करण्या बाबत

३) तक्रारीची दखल न घेणाऱ्या नांदुरा मुख्याधिकारी, आरोग्य अभियंता, आरोग्य निरिक्षक, बांधकाम अभियंता तथा बांधकाम मुख्य लिपिक नगर परिषद नांद्रा यांच्यावर शिस्त भंगाची कार्यवाही करण्या बाबत तक्रार.केली आहे या पूर्वी अनेक तक्रारी करूनही आज पर्यंत पालिकेने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी सामूहिक सह्याचे निवेदन शासनाला दिले आहे.विशेष म्हणजे शासनाच्या स्वच्छताा ॲप वर तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्या मुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत

Previous Post Next Post