श्री शेतकरी कुणबी समाज, सुटाळपुरा, खामगांव च्या वतीने गरीब मुले व मुलींना मोफत गणवेश व शालेय उपयोगी वस्तू चे वाटप उपक्रम...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
खामगांव येथील स्थानिक सुटाळपुरा भागातील श्री शेतकरी कुणबी समाज, खामगांव या संस्थे कढून दि. ११-सप्टेंबर रोजी श्री पाई हायस्कूल, जलंब इथे गरीब व समाजातील मुले व मुलींना शालेय गणवेश, लेटर बुक, लेटर पॅड व शालेय उपयोग वस्तू चे वाटप संस्थे कढून वाटप करण्यात आले. त्या वेळी संस्थे चे अध्यक्ष राम दळी, उपाध्यक्ष जयेश दळी व सहयांद्री अर्बन पत संस्था चे अध्यक्ष भगवान बर्डे, महाराष्ट्र राज्य ओ.बी.सी संघटक श्री विजय डवंगे तसेच श्री पाई हायस्कूल, जलंब चे अध्यक्ष श्री राठी साहेब, सहसचिव श्री देशमुख व मुख्याध्यापक श्री काळे सर, शिक्षक वृंद व सौ मधुश्री दळी, दीपाली दळी व रितेश दळी उपस्थित होते व असच उपक्रम दर वर्ष श्री शेतकरी कुणबी समाज कडून राबवीण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष जयेश दळी याने कळविले.