प्रसिध्द वसंत हंकारे करणार मुला-मुलींच्या समस्यांवर थेट संवाद..पालक व विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम..दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन कार्यक्रम...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव शिक्षण मंडळ संचलित सर्व शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता जवळपास 70% मुली आहेत. आजच्या बाहेरील वातावरणासोबतच सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अनेकदा विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आयुष्यात चुकीचे पाऊल उचलले जाते. अशा घटनांमुळे पालकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.या अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025, बुधवार सकाळी 11.00 वाजता “विद्यार्थी आणि पालक प्रबोधन” या विषयावर मा.श्री. वसंत हंकारे सर पोटतिडकीने मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम डॉ. व्ही.बी. कोलते इंजिनियरिंग कॉलेज, मलकापूर व दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, पालक, बंधुभगिनी यांनी उपस्थित राहावे, तसेच आपल्या परिचयातील मातापित्यांनाही या कार्यक्रमाबाबत अवगत करून सहभागासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.