डेसिबल मर्यादा आणि नियमांचे उल्लंघन तब्बल जळगाव जामोद तालुक्यात१३ डीजे चालकांवर पोलीस कारवाई...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
गणेशोत्सवा दरम्यान विसर्जन मिरवणुक व ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजेचा वापर केल्याप्रकरणी एकट्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये तब्बल १३ डीजे चालकांवर कारवाई करण्यात आली असून. डीजेच्या तीव्र आवाजाबद्दल पोलिसांनी वेळोवेळी सूचना देऊनही डीजे चालकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आयपीएस निलेश तांबे यांनी यावर्षीच्या गणेश उत्सवामध्ये तसेच ईद मिरवणूकीदरम्यान ध्वनी प्रदूषण आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने दिनांक ६ व ७ सप्टेंबर ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुक व ईद ए मिलाद मिरवणूकी दरम्यान मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊन शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांची संपूर्ण माहिती घेऊन तसेच आवाज मोजून ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच जळगाव जामोद तालुक्यातील बहुतांश मंडळांनी नियमांचे पालन करून पारंपारिक ढोल ताशे यासह काहींनी पारंपारिक वाद्याला आपली पसंती दिली असून गणरायाची विसर्जन मिरवणूक तसेच ईद ए मिलाद मिरवणूक शांततेत पार पाडली.जळगांव जामोद शहर व जामोद येथील कर्णकर्कश आवाजात डिजे वाजविल्या प्रकरणाची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या नेतृत्वात पीएसआय प्रशांत झेंडगे यांचे सह पोलीस कॉन्स्टेबल विलास पऱ्हाड यांनी केली.
_______________________
जळगाव जामोद तालुक्यातील गणेश विसर्जन तसेच जळगाव जामोद शहर व जामोद येथील ईद- ए मिलाद मिरवणुका शांततेत पार पडल्या असून, बहुतांश गणेश मंडळांनी ढोल ताशांचा वापर केला आहे तर काही ठिकाणी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिले गेले. जळगाव जामोद शहर तसेच जामोद येथे काही मंडळांनी व ईद-ए मिलाद मध्ये डीजे लावून मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविले. त्या अनुषंगाने सर्व डिजे चालकांना कायदेशीर नोटीस देण्यात आल्या असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून नियम मोडणाऱ्या १३ डीजे चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे..
श्रीकांत निचळ ठाणेदार जळगाव जामोद...