गाडेगांव खुर्द येथील दादाराव कैलास तायडे सेट परीक्षा उतीर्ण..
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी -
बुलढाणा जिल्ह्यातील गाडेगाव खुर्द येथील तरुण तडफदार दादाराव कैलास तायडे यांनी सेट परीक्षा उतीर्ण केली आहे. दादाराव कैलास तायडे यांनी कष्ट त्याग आणि जिद्दीने अभ्यास करून प्रेरणादायी लक्षवेधी शैक्षणिक प्रगती केली आहे.एका शेतमजुर आई वडिलांचा मुलगा जेव्हा शिक्षणात पदवी परीक्षा उतीर्ण होतो.तेव्हा तो कौतुकास पात्र ठरतो.परंतु संकुचित मानसिकता असलेला समाज त्यांची फरशी दखल घेत नाही.एका शेतमजूर आई वडिलांच्या मुलाने सेट परीक्षा उतीर्ण केली हेच त्यांच्या जिव्हारी लागते.यांच्या मुलांना नामांकित कल्लास लावून वाटेल तेवढा पैसा खर्च करून ही मुलाने लक्षवेधी प्रगती केली नाही.यांचे दुख व्यक्त करतांना आम्हालाही आता शेतमजूर व्हावे लागेल अशी प्रतिक्रिया देतात. म्हणजे यांच्या मनात शेतमजूर आणि त्यांच्या मुलामुली बद्दल काय भावना आहेत ही लक्षात येते.ग्रामीण भागातून शहरात आलेल्या दादाराव कैलास तायडे यांनी एलएलबी तसेच राजकारण शास्त्र,एम ए उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.तरी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सातत्यपूर्ण मेहनत चिकाटीने ज्ञान संपादन करण्याची लालसा ठेवली आहे.मुंबईत नोकरी करून झोपडपट्टीत राहून त्यांनी ही सेट परीक्षा उतीर्ण केली आहे. दादाराव कैलास तायडे यांचे क्रांतिकारी आंबेडकरी विचाराशी व चळवळीशी जिव्हाळ्याचे नाते जुळले आहे. विशरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा प्रभाव शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाहीचं.मग तोच त्यांचा जीवन संघर्ष डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी ठेऊन माणूस सर्व अडचणी वर मात करू यशस्वी घौड दौड करतो.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता स्वातंत्र्य समानता बंधुता आणि न्याय या शिकवणीवर त्यांचा ठाम विश्वास होता. शोषित वंचित समाजासाठी शिक्षण हेच करे शस्त्र आहे. त्यातुन प्रेरणा घेऊन बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवास घडवला आहे.दादाराव कैलास तायडे सेट परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे गाडेगांव खुर्द,जळगांव जामोद तालुक्यातील नातलग सगेसोयरे मित्रमंडळी यांच्यात विशेष आनंद व्यक्त होत आहे. दादाराव कैलास तायडे यांचे ध्येय आगामी काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे सामाजिक न्यायाच्या मूल्याचे जपून करणे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची जन जागृतीची मशाल पेटती ठेऊन पुढे नेणे हेच संकल्प आहे. त्याला सागर रामभाऊ तायडे पत्रकार,साहित्यिक,कामगार नेते आणि गाडेगांव खुर्द,जळगांव जामोद तालुक्यातील नातलग सगेसोयरे मित्रमंडळी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.