जि.प.शिक्षक दिपक उमाळे यांचा माजी कॅबिनेट मंत्री आ.डाँ.संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार...


 
जि.प.शिक्षक दिपक उमाळे यांचा माजी कॅबिनेट मंत्री आ.डाँ.संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार...

राजेश बाठे/संपादक आर सी २४ न्युज...

जळगाव जामोद तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चारबन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले उपक्रमशिल शिक्षक म्हणून ओळखले जाणारे दिपक उमाळे यांची राज्यशासनाच्या  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ साठी निवड झाली आहे. त्यादृष्टीने दिनांक २० सप्टेंबर रोजी जळगाव जामोद येथे जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माजी कॅबिनेट मंत्री डॉ संजय कुटे यांनी उपक्रमशील शिक्षक दीपक  उमाळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला यावेळी त्यांच्यासोबत गजानन सरोदे,आ.डाँ.संजय कुटे यांचे स्विय्य सहाय्यक निलेश शर्मा ,पांडुरंग बावस्कर,ऍडवोकेट दिलीप खोद्रे, मोहित सरप यांची उपस्थिती होती.शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. राज्य निवड समितीच्या २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही शिक्षकांची अंतिम निवड करण्यात आली. यंदा राज्यातील १०९ शिक्षकांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार असून, त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून प्राथमिकमध्ये उमाळे  यांचा समावेश आहे. दीपक उमाळे हे गेल्या ११ वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असून, आदिवासी क्षेत्रातील मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. चारबन येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक व सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक पद्धती विकसित केल्या आहेत. आदिवासी समाजाच्या चालीरीतींचा त्यांनी अभ्यास करून या आदिवासी लोकांचे शिक्षण अधिक सुलभ व आकर्षक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.या कामगिरीच्या बळावर शिक्षक दिपक उमाळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मातृ भाषेची अडचण सोडविण्यासाठी त्यानी  द्वि भाषा शब्दकोश निर्मिती केली असून स्वतःत्यांनी विद्यार्थ्यांची बोलीभाषा अवगत केली हे त्यांचे विशेष कार्य आहे..

Previous Post Next Post