पिकविण्यासाठी सोमवारी शिवसेनेचा'आक्रोश मोर्चा.. शेतकऱ्यांनी मोर्चात' सहभागी व्हावे तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांचे आवाहन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगांव जामोद तालुक्यातील शेतकरी पिकविमा खरीप २०२४-२५ एकुण मंजुर पिकविमा शेतकरी संख्या २६५६१ मंजुर रक्कम २७,२७,१९,९७० रूपये एवढी असून त्यातील यापुर्वी ४०७४ शेतक-यांना रू ७,७३,५८,१८७ रूपये वाटप झालेली असून माहे सप्टेंबर २०२५ मध्ये होणारी वाटप नुकसान भरपाई शेतक-यांची संख्या १०८८ असून २,५५,५२,३५१ एवढी रक्कम २ सप्टेंबर रोजी अदा करण्यात आलेली आहे. पण या दोन्ही मदत पाहता आजपर्यंत पिकविमा खरीप ५१६२ शेतक-यांना मिळालेला आहे. त्यातील यावर्षीचे २१३९९ शेतक-यांना अदयाप लाभ मिळायचा बाकी आहे. या शेतक-यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुश्ताक भाईजान, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल पाटील, विधानसभा संघटक भिमराव पाटील, शहरप्रमुख रमेश ताडे, उपशहर प्रमुख चांद कुरेशी यांच्या उपस्थितीत शिवसेना तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांच्या नेतृत्वात आकोश मोर्चाचे आयोजन दिनांक २९/९/२०२५ सोमवार ला करण्यात आले आहे. हा आक्रोश मोर्चा दुर्गाचौक जळगांव जामोद येथून सकाळी ११ वाजता निघून जुना आठवडी बाजार आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाकरिता तालुक्यातील सर्व शेतक-यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे व शेतक-यांनी मोर्चात सन २०२४-२५ पिकविमा काढल्याची पावतीची झेरॉक्स घेवून शेतकरी आकोश मोर्चात सहभागी व्हावे व आपल्या अर्ज पावतीची झेरॉक्स उपविभागीय अधिकारी (राजस्व) यांना मोर्चाच्या माध्यमातून देण्यात येईल. असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांनी केले आहे..